शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
3
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
4
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
5
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
6
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
7
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
8
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
9
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
10
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
11
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
12
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
13
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
14
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
15
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
16
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
17
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
18
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
19
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
20
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन

India China Face Off: चीनला धडा शिकवण्यासाठी सीमेवर जवानांची मोर्चेबांधणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2020 06:46 IST

प्रचंड तणाव : लडाखमध्ये नौदल, हवाईदल, लष्कर तैनात

- सुरेश डुग्गर जम्मू : लडाख भागात चिनी सैन्याशी वाढलेला तणाव पाहून भारतीय लष्कराने तिथे कोणत्याही प्रसंगाला सामोरे जाता यावे, यासाठी जोरदार तयारी सुरू केली असून, तिथे इंडो-तिबेटियन बॉर्डर पोलिसांच्या असलेल्या चौक्यांवर आता भारतीय जवान तैनात करण्यात आले आहेत. कोणत्याही स्थितीला जशास तसे प्रत्युत्तर देता यावे, यासाठी भारतीय लष्कर आता सज्ज झाले आहे. त्यासाठी काश्मीरमधून जवानांच्या अतिरिक्त तुकड्या लडाखच्या पूर्व भागात पाठवण्यात आल्या आहेत. सोमवारी रात्री झालेल्या तुंबळ हाणामारीत चीनच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यासह ३५ सैनिक मृत वा गंभीर जखमी झाले आहेत.जिथे तुंबळ हाणामारी झाली, त्या गलवान खोऱ्यात लोकांच्या येण्याजाण्यावर निर्बंध आणण्यात आले आहेत. हवाई दलाची दोन विमानेही आता श्रीनगर तसेच लेहला येऊ न दाखल झाली आहेत.वाहनांची ये-जा बंदलेह ते श्रीनगर महामार्गावरील सोनमर्गच्या पुढील रस्ता वाहनांसाठी बंदच केला आहे. या महामार्गावरील गांदरबल, कंगन, गुंड आणि सोनमर्गमध्ये राहणाऱ्यांनी सांगितले की मंगळवारी संध्याकाळपासून तेथून भारतीय जवान सीमेकडे जात असल्याचे दिसत आहेत. गगनगीरमध्ये पोलिसांनी तात्पुरती चौकी उभारली आहे. तिथेच खासगी वाहनांना अडविण्यात येत आहे.नियंत्रण रेषेवर गस्त सुरूलष्करी अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार सोमवारी दोन देशांच्या सैन्यांत संघर्ष झाल्यापासून लडाखच्या पूर्वेकडे कमालीचा तणाव आहे.लडाखमध्ये चीन व भारत यांच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील आयटीबीपीच्या चौक्या आता लष्कराने ताब्यात घेतल्या आहेत.तिथे चीनने काही गडबड करू नये, यासाठी आता लष्कराच्या मदतीने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर गस्त सुरु आहे.पेंगाँगमध्येही जादा तुकड्यापेंगाँग सरोवरातही जवानांनी गस्त वाढविली आहे. सरोवरात लष्कराने अत्यंत आक्रमक पवित्रा ठेवला आहे. तसेच नौदलाची एक तुकडीही सरोवरात येऊ न ठाकली आहे. ही तुकडी गेले १५ दिवस लेहमध्ये होती. ही तुकडी येण्याआधी नौदलाच्या अधिकाºयांनी पेंगाँग सरोवराच्या परिसराची पाहणी केली होती.एक विशेष तुकडी भरपूर रसद व युद्धसामग्रीसह एएन-३२ विमानाने लेहला रवाना झाली आहे.वाढत्या तणावामुळे काश्मीरमधील लष्कराचे जवानही लेहकडे गेले आहेत. तिथे पोहोचलेल्या जवानांना सर्व युद्धसामग्री पुरविण्यात आली आहे.

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानindian air forceभारतीय हवाई दलchinaचीनladakhलडाख