शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
4
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
5
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
6
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
7
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
8
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
9
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
10
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
11
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
12
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
13
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
14
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
15
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
16
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
17
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

पंधरा टक्के विद्यापीठांमध्ये आॅनलाइन पदवी, महिनाभरात तयार होणार नियमावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2018 2:56 AM

देशातील पंधरा टक्के विद्यापीठांना आॅनलाइन पदवी अभ्यासक्रम सुरु करण्यास केंद्र सरकार परवानगी देणार असल्याची माहिती केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली.

नवी दिल्ली : देशातील पंधरा टक्के विद्यापीठांना आॅनलाइन पदवी अभ्यासक्रम सुरु करण्यास केंद्र सरकार परवानगी देणार असल्याची माहिती केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली. विद्यापीठांच्या इतिहासात असे पाऊल प्रथमच उचलले जाणार आहे.नॅशनल अ‍ॅसेसमेंट अँड अ‍ॅक्रिडेशन कौन्सिलने (नॅक) अ+ दर्जा दिलेल्या विद्यापीठांनाच हे अभ्यासक्रम सुरु करता येणार आहेत. या निर्णयामुळे पदवीपर्यंतचे शिक्षण घेऊ इच्छिणाºयांना व नोकरदार वर्गालाही त्यांच्या वेळेप्रमाणे व ते कुठेही असले तरी आता शिकणे सुलभ होणार आहे.हे आॅनलाइन पदवी अभ्यासक्रम बिगरतांत्रिक स्वरुपाचे असणार असून त्यातून वैद्यकीय व अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रम मात्र वगळण्यात आले आहेत. या निर्णयामुळे शिक्षणाचा दर्जा खालावेल अशी भीती व्यक्त होत आहे. उच्च शिक्षण खात्याचे सचिव केवलकुमार शर्मा यांनी सांगितले की, यासंदर्भातील नियमावली तयार करण्याचे काम विद्यापीठ अनुदान आयोग तयार करीत असून ते महिन्याभरात होईल.सरकारने निवडलेल्या १५ टक्के विद्यापीठांशिवाय ज्यांना आॅनलाइन पदवी अभ्यासक्रम सुरु करण्याची इच्छा असेल त्यांनी दोन वर्षांच्या कालावधीत उत्तम शैक्षणिक कामगिरी करुन नॅककडून अ + दर्जा मिळवावा अशी अट घालण्यात येणार आहे. भारतामध्ये तंत्रज्ञानाचा प्रसार झपाट्याने होत असून त्याचा उपयोग सरकार उच्च शिक्षण प्रसारासाठीकरणार आहे. मोबाइलच्या वाढत्या वापराचा उपयोगही आॅनलाइनपदवी अभ्यासक्रम शिकण्यासाठी करता येईल.विद्यापीठांनी आॅनलाइन पदवी अभ्यासक्रम सुरु केल्यानंतर बहि:शाल अभ्यासक्रमांशी त्यांची कळत नकळत तुलना व स्पर्धा होणे अटळ आहे. जगभरात ज्या ज्या विद्यापीठांनी आॅनलाइन पदवी अभ्यासक्रम सुरु केले आहेत त्यांना म्हणावे तसे यश मिळालेले नाही. आॅनलाइन पदवी शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांचे मुल्यांकन करणे हे तसे कठीण काम असते. देशाच्या उच्च शिक्षण क्षेत्रात शिक्षकांची कमतरता असून आॅनलाइन पदवी अभ्यासक्रमामुळे विद्यार्थ्यांची संख्या वाढणार असून त्यांना मार्गदर्शन करताना शिक्षकांची खूप तारांबळ उडणार आहे.

टॅग्स :Studentविद्यार्थी