ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 15 - फिफा अंडर 17 वर्ल्डकप आयोजन समितीच्या उपाध्यक्षपदी केंद्रीयमंत्री बाबुल सुप्रियो यांची निवड करण्यात आली आहे.
अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे (एआयएफएफ) अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी बुधवारी बाबुल सुप्रियो यांची निवड झाल्याचे ट्विट करत त्यांचे अभिनंदन केले आहे. यावेळी प्रफुल्ल पटेल म्हणाले, माझे मित्र आणि फुटबॉलचे चाहते असलेले बाबुल सुप्रियो यांची फिफा अंडर 17 वर्ल्डकप आयोजन समितीच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आमच्यासोबत येणाबद्दल आम्ही त्यांचे स्वागत करतो. तसेच, बाबुल सुप्रियो यांनी सुद्धा या नियुक्तीबद्दल प्रफुल्ल पटेल यांचे आभार मानले आहेत. मला फिफा अंडर 17 वर्ल्डकप आयोजन समितीच्या उपाध्यक्षपदी नियुक्त केल्याबद्दल मी प्रफुल्ल पटेल यांना धन्यवाद देतो, असे ट्विट बाबुल सुप्रियो यांनी केले आहे.
दरम्यान, फिफा अंडर 17 वर्ल्डकप स्पर्धा येत्या ऑक्टोबर महिन्यात असून या स्पर्धेचे आयोजन पहिल्यांदाच भारतात होतात होत आहे. भारतातील सहा शहरात फिफा अंडर 17 वर्ल्डकप स्पर्धा होणार आहेत.