जम्मू काश्मीरमधील किश्तवाड जिल्ह्यातील सिंहपोरा परिसरात रविवारपासून लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये भीषण चकमक सुरू आहे. या परिसरात किमान तीन दहशतवादी लपून बसलेले असल्याची माहिती पोलीस आणि लष्करामधील सूत्रांनी दिली आहे. दोन्ही बाजूंनी सातत्याने गोळीबार होत असून, सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसराला घेराव घातला आहे. दरम्यान, या चकमकीमध्ये आतापर्यंत लष्कराचे सुमारे ७ जवान जखमी झाले असून, त्यांच्यावर उधमपूर येथे उपचार सुरू आहेत.
किश्तवाडमधील घनदाट जंगलांमध्ये काही दहशतवादी लपून बसले असल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. त्यानंतर सुरक्षा दलांकडून शोधमोहिम हाती घेण्यात आली होती. याचदरम्यान, जंगलात लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. त्यानंतर चकमकीस सुरुवात झाली. येथील प्रतिकूल भौगोलिक परिस्थिती आणि घनदाट जंगलांमुळे सुरक्षा दलांसमोरील आव्हान वाढले आहे. मात्र सुरक्षा दलांनी परिसराला चौफेर घेराव घालून, दहशतवाद्यांचे पळून जाण्याचे सर्व मार्ग बंद केले आहेत. पोलीस आणि लष्कराचे जवान सतर्कतेने पुढे जात असून, चकमकीदरम्यान होत असलेल्या गोळीबाराचा आवाज दूरदूरपर्यंत ऐकू येत आहे.
दरम्यान, या चकमकीच्या पार्श्वभूमीवर किश्तवाड जिल्ह्यात सुरक्षा दलांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच अनेक ठिकाणी नाकेबंदी करण्यात आली आहे. संशयास्पद हालचाल दिसल्यात त्वरित कारवाई करता यावी यासाठी वाहनांची कसून तपासणी केली जात आहे.
Web Summary : A fierce encounter between security forces and terrorists is underway in Kishtwar, Jammu & Kashmir. Seven soldiers were injured and are receiving treatment. Security forces have cordoned off the area and a search operation is in progress amidst dense forests.
Web Summary : जम्मू-कश्मीर के किश्तवाड़ में सुरक्षा बलों और आतंकवादियों के बीच भीषण मुठभेड़ जारी है। सात जवान घायल हो गए हैं जिनका इलाज चल रहा है। सुरक्षा बलों ने इलाके को घेर लिया है और घने जंगलों में तलाशी अभियान जारी है।