शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

विजापूरमध्ये भीषण चकमक; कर्रेगुट्टा टेकड्यांमध्ये लपलेल्या 15+ नक्षलवाद्यांचा खात्मा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2025 14:27 IST

मागील अनेक दिवसांपासून या भागात नक्षलवाद्यांविरोधात कारवाई सुरू आहे.

Naxalite Enconter : छत्तीसगड-तेलंगणा सीमेवरील विजापूर जिल्ह्याच्या कर्रेगुट्टा टेकड्यांवर नक्षलवाद्यांविरुद्ध सुरू असलेल्या कारवाईत सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. सुरक्षा दलांनी पहाटे झालेल्या चकमकीत 15+ नक्षलवाद्यांना ठार केले आहे. नक्षलवाद्यांविरुद्ध सुरू असलेल्या कारवाईत ठार झालेल्या नक्षलवाद्यांचा आकडा आणखी वाढू शकतो, असे सांगितले जात आहे. सीआरपीएफचे डीजी ज्ञानेंद्र प्रताप सिंह दिल्लीहून या कारवाईवर लक्ष ठेवून आहेत. 

छत्तीसगडचे एडीजी नक्षल ऑपरेशन्स विवेकानंद सिन्हा, सीआरपीएफ आयजी राकेश अग्रवाल आणि बस्तर आयजी पी. सुंदरराज परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. गेल्या 15 दिवसांपासून ही कारवाई सुरू आहे. या कारवाईत सहभागी असलेल्या नक्षलवाद्यांना डीआरजी, कोब्रा, सीआरपीएफ, एसटीएफचे सैनिक सतत प्रत्युत्तर देत आहेत.

आतापर्यंतचे सर्वात मोठे ऑपरेशनछत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर करण्यात आलेली ही सर्वात मोठी कारवाई असल्याचे म्हटले जात आहे. एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, बस्तर प्रदेशात सुरू केलेल्या सर्वात मोठ्या दहशतवादविरोधी कारवाईंपैकी एक म्हणून ओळखले जाणारे ऑपरेशन संकल्पमध्ये जिल्हा राखीव रक्षक (DRG), बस्तर फायटर्स, विशेष कार्य दल (STF), राज्य पोलिसांच्या सर्व युनिट्स, केंद्रीय राखीव पोलिस दल (CRPF) आणि त्यांची विशेष युनिट कोब्रा यासह विविध युनिट्समधील सुमारे 24000 सुरक्षा कर्मचारी सहभागी आहेत.

या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी टेकड्या वेढल्या असून, सतत कारवाई करत आहेत. बुधवारी सकाळपासूनच या टेकडीवर जोरदार कारवाई सुरू होती. या दरम्यान सुरक्षा दलांनी चकमकीत 20 नक्षलवाद्यांना ठार केले.

14 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण नक्षलवाद्यांना ठार मारल्यानंतरही ही कारवाई थांबलेली नाही. करेगुट्टाच्या टेकड्यांवर अजूनही गोळीबार सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. यामध्ये नक्षलवाद्यांचे मोठे नुकसान झाले आहे. याशिवाय, बस्तरमध्ये नक्षलवादी स्वतः आत्मसमर्पण करत आहेत. बस्तरमधील 14 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले. यापैकी 13 नक्षलवादी हे विजापूरचे रहिवासी होते. यापूर्वी तेलंगणामध्ये 64 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे.

टॅग्स :naxaliteनक्षलवादीChhattisgarhछत्तीसगडTelanganaतेलंगणा