शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
2
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
3
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
4
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश
5
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
6
JM Mhatre: जे. एम. म्हात्रेंच्या ४४ कोटींच्या ठेवी, गुंतवणुकीवर ईडीची टाच
7
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर आज दिल्लीत होणार अंत्यसंस्कार, पण का झाला उशीर?
8
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
9
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
10
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
11
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
12
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
13
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
14
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
15
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
16
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
17
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
18
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
19
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
20
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा

'फरारी की सवारी' उद्योगपतीच्या जिवावर बेतली, ३ कोटींच्या कारचा चक्काचूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2018 17:16 IST

हावडा येथे भरधाव 3 कोटींची फरारी गाडी दुभाजकाला धडकून भीषण अपघात झाला असून, अपघातात गाडीचालकाचा जागीच मृत्यू ओढावला.

कोलकाता- हावडा येथे भरधाव 3 कोटींची फरारी गाडी दुभाजकाला धडकून भीषण अपघात झाला असून, अपघातात उद्योगपती गाडीचालकाचा जागीच मृत्यू ओढावला. कोलकाता शहरापासून 22 किलोमीटर अंतरावरच्या एनएच 6 महामार्गावर हा अपघात झाला आहे. हा अपघात एवढा भीषण होता की, दुभाजकाला गाडी धडकल्यानंतर गाडीचा चक्काचूर झाला.43 वर्षीय उद्योगपती शिवाजी हे फरारी गाडी चालवत होते. त्यांच्या बाजूला त्याचा 17 वर्षांचा मुलगा श्रेयन बसला होता. तर मागच्या सीटवर मुलगी बसली होती. एनएच 6 या राष्ट्रीय महामार्गावर वीकेंड पिकनिकवरून परतत असताना हा अपघात झाला. साडेतीन कोटींची फरारी दुभाजकाला धडकल्यानं तिचा अक्षरशः चक्काचूर झाला. सकाळच्या वेळेत रस्ता खाली असल्यानं शिवाजी यांनी गाडी 150 ते 200 किलोमीटरच्या स्पीडनं पळवली.दोमजूर ब्रिजवर आल्यानंतर शिवाजी यांचा गाडीवरील ताबा सुटला आणि गाडी दुभाजकाला जाऊन आदळली. त्यात बसलेल्या शिवाजी यांचा जागीच मृत्यू झाला. तर मागे बसलेल्या मुलीला गंभीर दुखापत झाली. शिवाजी रॉय हे एम. एल. रॉय अँड कंपनी सॅनिटेशन्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे संचालक होते.  पोलिसांच्या माहितीनुसार, 43 वर्षांचे शिवाजी रॉय गाडी चालवत होते. त्यावेळी 21 वर्षांची आशना सुराना त्यांच्या मागेच बसली होती. तर 17 वर्षांचा मुलगा त्यांच्या बाजूला बसला होता. आजूबाजूच्या लोकांनी तात्काळ बचावकार्य राबवत सुराना आणि त्यांचा मुलगा श्रेयन याला सुखरूप बाहेर काढलं. शिवाजी यांचा जागीच मृत्यू झाला. तर सुरानावर कोलकातातल्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.रविवारी सकाळी शिवाजी पिकनिकवरून परतत असताना मित्रांसोबत नाश्ता करण्यासाठी जात होते. त्यांचे मित्र दुस-या गाडीतून येथ होते. विशेष म्हणजे फरारीचा अपघात एवढा भीषण होता की, गाडीत असलेले एअरबॅग्सही फुटले आहेत. तसेच पुढचा दरवाजा पूर्णतः तुटला आहे. 

टॅग्स :Accidentअपघात