शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

चौथ्या मजल्यावरून पडला आणि ग्रिलमध्ये अडकला, मृत्यूच्या दाढेत गेलेल्या तरुणाचा असा जीव वाचला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2020 17:02 IST

दक्षिण दिल्लीमध्ये पावसामुळे घसरून एक व्यक्ती चौथ्या मजल्यावरून खाली पडली. मात्र जमिनीवर आदळण्यापूर्वीच त्या व्यक्तीचा पाय ग्राऊंड फ्लोअरवर असलेल्या ग्रीलमध्ये अडकला.

नवी दिल्ली -  काळ आला होता पण वेळ आली नव्हती, अशी म्हण प्रचलित आहे. नुकताच दिल्लीमध्ये घडलेल्या एका घटनेमधून तिचा पुन्हा एकदा प्रत्यय आला. दक्षिण दिल्लीमध्ये पावसामुळे घसरून एक व्यक्ती चौथ्या मजल्यावरून खाली पडली. मात्र जमिनीवर आदळण्यापूर्वीच त्या व्यक्तीचा पाय ग्राऊंड फ्लोअरवर असलेल्या ग्रीलमध्ये अडकला. दरम्यान, या घटनेची माहिती मिळाल्यानंतर मालवीयनगर पोलीस ठाण्यातील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर या व्यक्तीची सुटका करून त्याला रुग्णालयात दाखल केले.

पोलीस अधिकारी अतुल ठाकूर यांनी दिलेल्या माहितीनुसार, २९ जुलै रोजी एक व्यक्ती चौथ्या मजल्यावरून खाली पडल्याची सूचना पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तिथे एक व्यक्ती चौथ्या मजल्यावरून पडून तिचा पाय ग्रीलमध्ये अडकल्याचे सब इंस्पेक्टर किशन सैनी आणि कॉन्स्टेबल शीशराम यांच्या निदर्शनास आले.  

यादरम्यान ही व्यक्ती उटली लटकलेली होती. तसेच ग्रीलचा टोकदार भाग त्याच्या पायात घुसलेला होता. त्यानंतर पोलिसांनी त्वरित वेल्डरला बोलावले आणि कटरने ग्रिल कापून या व्यक्तीची सुटका केली. तसेच त्याल रुग्णालयात दाखल केले.  जीवघेण्या दुर्घटनेतून बालंबाल बचावलेल्या या व्यक्तीचं नाव किशन कुमार आहे.

पोलिसांनी सांगितले की, किशन कुमार हे चौथ्या मजल्यावर माती तपासण्यासाठी गेले होते. तेवढ्यात त्यांचा पाय घसरला आणि ते खाली पडले. मात्र ग्रिलमध्ये पाय अडकल्याने बचावले. लॉकडाऊनपूर्वी किशन हे गुरुग्राममधील एका पार्लरमध्ये काम करत होते. लॉकडाऊननंतर ते दिल्लीत आले होते. दरम्यान, ते सध्या दिल्लीतील रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांची प्रकृती स्थिर आहे.

टॅग्स :delhiदिल्लीIndiaभारत