शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

दहशतवादाचा धोका कायम, सागरी मार्गाने अतिरेकी भारतात घुसण्याची भीती, व्हाइस अ‍ॅडमिरल गिरीश लुथरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2017 05:52 IST

मुंबई : सागरी मार्गाने घुसून भारतात दहशतवादी हल्ल्याचा धोका अद्याप कायम आहे. २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यानंतर मच्छीमारांच्या जहाजांची ओळख पटविणारी यंत्रणा अद्ययावत करण्याचे काम हाती घेण्यात आले. मोठ्या जहाजांवर अशा प्रकारच्या यंत्रण बसविण्यात आल्या आहे, परंतु छोट्या बोटी व होड्यांमध्ये अद्याप अशी यंत्रणा उभारण्यात आले नसल्याचे, नौदलाच्या पश्चिम विभागाचे प्रमुख ...

मुंबई : सागरी मार्गाने घुसून भारतात दहशतवादी हल्ल्याचा धोका अद्याप कायम आहे. २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यानंतर मच्छीमारांच्या जहाजांची ओळख पटविणारी यंत्रणा अद्ययावत करण्याचे काम हाती घेण्यात आले. मोठ्या जहाजांवर अशा प्रकारच्या यंत्रण बसविण्यात आल्या आहे, परंतु छोट्या बोटी व होड्यांमध्ये अद्याप अशी यंत्रणा उभारण्यात आले नसल्याचे, नौदलाच्या पश्चिम विभागाचे प्रमुख व्हाइस अ‍ॅडमिरल गिरीश लुथरा यांनी शुक्रवारी स्पष्ट केले. विशेष म्हणजे, २६/११च्या दहशतवाद्यांनी छोट्या बोटीतूनच हल्ला केला होता.नौदल दिनाच्या पार्श्वभूमीवर भारताची विमानवाहू युद्धनौका ‘आयएनएस विक्रमादित्य’वर आयोजित पत्रकार परिषदेत गिरीश लुथरा बोलत होते. २६/११च्या दहशतवादी हल्ल्यानंतर जहाजांवर ओळख पटविण्याची अद्ययावत यंत्रणा उभारण्याचे काम हाती घेण्यात आले. खलाशी व मच्छीमारांना बायोमेट्रिक ओळखपत्र देण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. आतापर्यंत ७० ते ८० टक्के मच्छीमारांना बायोमेट्रिक कार्ड देण्यात आले आहेत. मोठ्या व मध्यम आकाराच्या जहाजांची ओळख पटविणे, नौकांच्या येण्या-जाण्यावर लक्ष ठेवण्यासाठी आवश्यक यंत्रणा उभारण्यात आली आहे. मात्र, छोट्या बोटी व होड्यांवर अद्याप अशी यंत्रणा बसविण्याचे काम शिल्लक आहे.भारतीय नौदलाचे सागरी वर्चस्व वाढत आहे. बदलती जागतिक समीकरणे, नव्याने येणाºया आव्हानांच्या अनुषंगाने भारतीय नौदलानेही आपले धोरण बदलले. पूर्वी हिंदी महासागरात वर्चस्व असलेले भारतीय नौदल आता त्या पलीकडच्या समुद्राची मुशाफिरी करत आहे. भारतीय सागरी सीमांचे रक्षण करतानाच जागतिक पातळीवरही सामरीकदृष्ट्या प्रभाव टाकण्यासाठी आवश्यक ती पावले उचलली जात आहेत. भारतीत नौदल आता लांब पल्ल्याच्या कारवायांसाठी सज्ज होत असल्याचे लुथरा यांनी स्पष्ट केले.कलवरीची प्रतीक्षा संपलीस्कॉर्पियन श्रेणीतील भारतीय बनावटीची पाणबुडी लवकरच नौदलाच्या ताफ्यात दाखल होणार आहे. आधुनिक आणि कठोर सागरी चाचण्यांमुळे कलवरीच्या समावेशाला विलंब झाला आहे.बदलत्या आव्हानांना सामारे जाण्यासाठी युद्धनौका आणि पाणबुड्यांच्या चाचणीतही नौदलाने बदल केल्याचे लुथरा यांनी सांगितले.१४ डिसेंबर रोजी कलवरी औपचारिकपणे नौदलाच्या ताफ्यात दाखल होणार असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :indian navyभारतीय नौदलIndiaभारतMumbaiमुंबई