शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

आता अंतराळातही युद्धाची भीती! सीडीएस जनरल अनिल चव्हाण यांनी दिला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2023 12:37 IST

अंतराळातील शस्त्रास्त्रीकरणाच्या स्पर्धेमुळे अवकाशात युद्धाची भीती निर्माण झाली आहे, असा इशारा संरक्षण दल प्रमुख (सीडीएस) जनरल अनिल चव्हाण यांनी दिला आहे.

नवी दिल्ली :

अंतराळातील शस्त्रास्त्रीकरणाच्या स्पर्धेमुळे अवकाशात युद्धाची भीती निर्माण झाली आहे, असा इशारा संरक्षण दल प्रमुख (सीडीएस) जनरल अनिल चव्हाण यांनी दिला आहे. सीडीएस चौहान यांनी मंगळवारी भारतीय संरक्षण दलावरील एका चर्चासत्राचे उदघाटन केले. या वेळी ते म्हणाले की, अंतराळ क्षेत्रात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश करण्यावर तसेच विकासावर विशेष भर देणे गरजेचे झाले आहे.  ‘‘अंतराळ हे एक क्षेत्र आहे जे जमीन, समुद्र, हवा आणि अगदी सायबरसह इतर क्षेत्रांमध्ये क्षमता वाढवत आहे. अंतराळाचा लष्करी वापर हा एक महत्त्वाचा चर्चेचा विषय आहे ज्यापासून आपण दूर राहू शकत नाही,’’ असेही चव्हाण म्हणाले. अत्याधुनिक तंत्रज्ञान आवश्यक- ‘‘रशिया आणि चीनच्या उपग्रहविरोधी चाचण्यांचा संदर्भ देत भारताने अंतराळ क्षेत्रात आक्षेपार्ह आणि बचावात्मक क्षमता निर्माण करण्याच्या गरजेवर भर दिला. सध्याची आणि भविष्यातील आव्हाने पाहता भारताने आपले प्रयत्न अधिक व्यापक करण्याची गरज आहे. आपण सर्वांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश करण्यावर विशेष लक्ष केंद्रित करून दुहेरी-वापराचे व्यासपीठ विकसित करण्याचे ध्येय ठेवले पाहिजे,’’ असेही ते म्हणाले.