शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
2
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
3
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
4
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
5
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
6
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
7
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
8
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
9
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
10
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
11
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
12
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
13
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
14
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
15
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
16
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
17
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
18
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
19
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
20
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार

हार्ट अटॅकपेक्षा घातक फॅटी लिव्हरचे मुलेही बळी; बदलती जीवनशैली ठरतेय घातक; इतर विकारांचाही वाढता धोका 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2023 11:01 IST

आठ ते १४ वर्षे वयोगटातील मुलांनादेखील मसालेदार आणि गोड पदार्थांच्या अतिसेवनामुळे फॅटी लिव्हरचा त्रास होत आहे.

नवी दिल्ली : दारू पिणाऱ्यांनाच यकृताचा आजार होतो, असा तुम्ही विचार करीत असाल तर तो तुमचा गैरसमज आहे. कारण मद्यपान करणाऱ्यांपैकी फक्त एक तृतीयांश लोकांना यकृताचा त्रास होतो, तर उरलेल्या लोकांना लठ्ठपणा, असंतुलित आहार, मधुमेह, हृदय, अतिकोलेस्टेरॉल, थायरॉईड, हृदयरोग यांसह इतर आजारांमुळे लिव्हर सिरोसिस आणि नॉन-अल्कोहोल यकृत रोग होतात. आठ ते १४ वर्षे वयोगटातील मुलांनादेखील मसालेदार आणि गोड पदार्थांच्या अतिसेवनामुळे फॅटी लिव्हरचा त्रास होत आहे.

आजकाल कोणत्याही सुपरस्पेशालिटी रुग्णालयाच्या गॅस्ट्रोएंटोरोलॉजी विभागाच्या ओपीडीमध्ये फॅटी लिव्हरचे रुग्ण सातत्याने पाहायला मिळत आहेत. ओपीडीमध्ये येणाऱ्या प्रत्येक दहाव्या व्यक्तीला फॅटी लिव्हरचा त्रास होत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. विशेषत: ‘हिपॅटायटिस-बी’ आणि ‘सी’ हे सुरुवातीला माहीत नसतात. माहिती मिळेपर्यंत या आजाराने गंभीर स्वरूप धारण केलेले असते. 

हा आजार मुळात जीवनशैलीशी निगडित आहे. त्यामुळे आता तरुणांनाच नाही तर लहान मुलांनाही फॅटी लिव्हरची समस्या भेडसावत आहे. यामध्ये आठ ते १४ वयोगटातील मुलांचा समावेश आहे. जंकफूड आणि फास्टफूडव्यतिरिक्त घरांमध्ये मसालेदार, गोड पदार्थांच्या अतिसेवनामुळे त्यांचा लठ्ठपणा वाढला आहे. याशिवाय त्यांची शारीरिक हालचाल कमी होणे हेही एक मोठे कारण आहे. कोरोनाच्या कालावधीनंतर या आजाराचे रुग्ण १५ टक्क्यांनी वाढले आहेत. तज्ज्ञांच्या मते, ते हृदयविकारापेक्षाही धोकादायक आहे.

काळजी काय घ्याल?- वजन आणि आहारावर नियंत्रण ठेवा- कार्बोहायड्रेट आणि कमी चरबीयुक्त पदार्थांचे सेवन- मांसाहार आणि दारूचे सेवन करू नका- दररोज ४५ मिनिटे व्यायाम करावा

लक्षणे...- सतत थकवा येणे- पोटाच्या उजव्या बाजूला दुखणे आणि सूज येणे

तीन टक्के रुग्ण समस्यांनी ग्रस्तफॅटी लिव्हरच्या रुग्णांमध्ये ३० वर्षांपर्यंतची मुले आणि तरुणांचा समावेश आहे. संपूर्ण पोटाच्या अल्ट्रासाउंडसाठी १०० रुग्णांची तपासणी केली असता १० पेक्षा जास्त रुग्णांमध्ये फॅटी लिव्हर आढळून येतात. यातील दोन ते तीन टक्के रुग्ण गंभीर समस्यांनी ग्रस्त आहेत.

टॅग्स :Healthआरोग्य