शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

वडील वाटत होते लग्नाच्या पत्रिका, मुलगा झाला शहीद; मेजर चित्रेश यांची मन हेलावणारी कहाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2019 12:14 IST

पुलवामा येथील आत्मघाती दहशतवादी हल्ल्याची घटना ताजी असतानाच शनिवारी नियंत्रण रेषेजवळ झालेल्या आयईडी स्फोटात मेजर चित्रेश सिंह बिष्ट हे शहीद झाले.

ठळक मुद्दे शनिवारी नियंत्रण रेषेजवळ झालेल्या आयईडी स्फोटात मेजर चित्रेश सिंह बिष्ट हे शहीद झालेमेजर चित्रेश यांचा येत्या 7 मार्च रोजी विवाह होणार होता. मात्र वडील सांगत असतानाही  विवाहाच्या पूर्वतयारीसाठी सुट्टी घेण्यापेक्षा त्यांनी देशसेवेला प्राधान्य दिले मेजर चित्रेश सिंह यांच्या वीरमरणाचे वृत्त समजताच त्यांच्या विवाहाच्या तयारीत गुंतलेल्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला

देहराडून - पुलवामा येथील आत्मघाती दहशतवादी हल्ल्याची घटना ताजी असतानाच शनिवारी नियंत्रण रेषेजवळ झालेल्या आयईडी स्फोटात मेजर चित्रेश सिंह बिष्ट हे शहीद झाले. मेजर चित्रेश यांचा येत्या 7 मार्च रोजी विवाह होणार होता. मात्र वडील सांगत असतानाही  विवाहाच्या पूर्वतयारीसाठी सुट्टी घेण्यापेक्षा त्यांनी देशसेवेला प्राधान्य दिले होते. दरम्यान, राजौरी जिल्ह्यात नियंत्रण रेषेजवळ आईडी बॉम्ब निकामी करत असताना स्फोट होऊन त्यांना वीरमरण आले.  मेजर चित्रेश सिंह यांच्या वीरमरणाचे वृत्त समजताच त्यांच्या विवाहाच्या तयारीत गुंतलेल्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मेजर चित्रेश यांनी आतापर्यंत 25 बॉम्ब निकामी केले होते. अभ्यासात हुशार असलेल्या चित्रेश यांनी मेजर रँकच्या परीक्षेत नववे स्थान पटकावले होते, अशी माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली. अधिकाऱ्यांनी सांगितले की, दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास  राजौरी जिल्ह्यातील नौशेरा सेक्टरमधल्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या आतील 1.5 किलोमीटर अंतरावर दहशतवाद्यांनी ट्रॅकवर आयईडी बॉम्ब पेरून ठेवल्याची महिती मिळाली होती. त्यातील एक बॉम्ब यशस्वीपणे निकामी करण्यात आला. मात्र दुसरा बॉम्ब निकामी करत असताना बॉम्बचा स्फोट झाला. त्यात मेजर  चित्रेश यांना वीरमरण आले.  

 

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानJammu Kashmirजम्मू-काश्मीरIndiaभारत