शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
2
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
3
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
4
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
5
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
6
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
7
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
8
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
9
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
10
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
11
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
12
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
13
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
14
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
15
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
16
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
17
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
18
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
19
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
20
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल

Video: जावयासाठी सासरा मैदानात; प्रजासत्ताक दिनी सुरक्षा भेदून खिशातून फेकला कागद

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2024 13:52 IST

कर्नाटकचे राज्यपाल आणि मुख्यमंत्री सिद्धरमैय्या आणि यांच्या प्रमुख उपस्थितीत बंगळुरुत प्रजासत्ताक दिनाच्या ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

बंगळुरू - राजधानी दिल्लीतील नवीन संसद भवनात काही तरुणांनी घुसकोरी केल्याचा प्रकार घडल्याने संसदेच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. त्यानंतर, आज दिल्लीतील राजपथावरील परेडमध्ये सहभागी होणाऱ्या नागरिकांचीही कसून तपाणसी करुनच त्यांना प्रवेश देण्यात आला आहे. अगदी पायातील बूटही तपासण्यात आले आहेत. मात्र, बंगळुरूतील प्रजासत्ताक दिनाच्या परेड कार्यक्रमात एका व्यक्तीने घुसकोरी करत सर्वांचे लक्ष वेधले. यावेळी, पोलिसांनी संबंधित व्यक्तीला तत्काळ ताब्यात घेऊन बाहेर नेले. त्यानंतर, त्याकडे चौकशीही करण्यात आली. 

कर्नाटकचे राज्यपाल आणि मुख्यमंत्री सिद्धरमैय्या आणि यांच्या प्रमुख उपस्थितीत बंगळुरुत प्रजासत्ताक दिनाच्या ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी अनेक मान्यवर आणि सर्वसामान्य नागरिकही मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, एका व्यक्तीन मैदानात येऊन मुख्यमंत्री सिद्धरमैय्या यांच्यासमोर जाऊन आपली तक्रार सांगण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी, तैनात असलेल्या पोलिसांनी लगेचच त्यांना ताब्यात घेऊन बाहेर काढले. मात्र, या व्यक्तीने मुख्यमंत्री सिद्धरमैय्या आणि राज्यपाल यांच्यासमोर आपल्या शर्टाच्या खिशातून एक पत्र काढून तिथे टाकल्याचं व्हिडिओत दिसून येत आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.  पोलिसांनी पडकल्यानतंर संबंधित व्यक्तीला बाहेर माध्यमांनी प्रश्न विचारले असता, पुरुषोत्तम असं त्यांचं नाव असल्याची माहिती समोर आली आहे. नैराश्य आणि सरकारच्या उदासिनतेमुळे पुरुषोत्तम यांनी प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात गोंधळ घालून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या या कृतीवरुन, जावयासाठी सासरा मैदानात उतरल्याचं समजलं. कारण, त्यांच्या जावयाने KPSC परीक्षा दिली असून अद्यापही या परीक्षेचा निकाल जाहीर झाला नसल्याचा संताप त्यांनी अशारितीने व्यक्त केला आहे. दरम्यान, पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं असून पुढील अधिक चौकशी सुरू आहे. 

टॅग्स :Republic Dayप्रजासत्ताक दिन २०२४BengaluruबेंगळूरKarnatakकर्नाटकSocial Viralसोशल व्हायरल