शहरं
Join us  
Trending Stories
1
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
2
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
3
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
4
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
5
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
6
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
7
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
8
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
9
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
10
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
11
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
12
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
13
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
14
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
15
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
16
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
17
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
18
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
19
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
20
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले

हृदयद्रावक! बापाला शवविच्छेदनासाठी बाईकवरून न्यावा लागला मुलाचा मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2021 09:48 IST

जिल्हा रुग्णालयाचा भोंगळ कारभार; बराच वेळ थांबूनही वाहनं मिळालं नाही

सीतापूर: प्रशासनाचा कारभार किती बेजबाबदार असू शकतो, याची प्रचिती उत्तर प्रदेशातील सीतापूरमध्ये आली आहे. आपला मुलगा गमावलेल्या एका वडिलांवर त्याच मुलाचा मृतदेह दुचाकीवरून शवविच्छेदनासाठी नेण्याची वेळ आली. सीतापूरच्या जिल्हा रुग्णालयात हा प्रकार घडला. मदतीसाठी लाचार झालेल्या वडिलांनी मृतदेह नेण्यासाठी गयावया केली. मात्र त्यांना कोणतीही मदत मिळाली नाही. त्यामुळे वडिलांना मुलाचा मृतदेह दुचारीवरून न्यावा लागला.मुंबईहून परतलेल्या युवकानं लावला गळफास; खोलीच्या भिंतीवर लिहिलं होतं आत्महत्येचं ‘कारण’ अन्...तालगावच्या देवरियात राहणाऱ्या छविनग यांचा मुलगा अंकुरचा मंगळवारी जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला. एका अपघातात जखमी झाल्यानंतर अंकुरला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. अंकुरच्या मृत्यूनंतर त्याचा मृतदेह शवागारात ठेवण्यात आला. त्यानंतर बुधवारी जिल्हा रुग्णालयात पंचनामा झाला. नातेवाईकांनी त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नेण्याची तयारी सुरू केली. मृतदेह पाठवण्यासाठी त्यांनी जिल्हा रुग्णालयाला वाहनाची व्यवस्था करण्यास सांगितलं.वाहनासाठी अंकुरच्या कुटुंबियांनी आपत्कालीन सेवा देणाऱ्या रुग्णालयातील व्यवस्थेशी संपर्क साधला. छविनग यांनी रुग्णवाहिकेच्या चालकाशी संपर्क साधला. त्यानं १० मिनिटांत येतो असं सांगितलं. मात्र एक तास उलटूनही तो न आल्यानं छविनग आणि त्यांचे कुटुंबीय चालकाकडे गेले. त्यावेळी तो मद्यधुंद अवस्थेत होता. वेळ निघून जात होती. दीड तास उलटूनही वाहनाची व्यवस्था न झाल्यानं छविनग यांनी अंकुरचा मृतदेह घेऊन दुचाकीवरून शवविच्छेदनगृह गाठलं.