शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

भाऊ अन् वडिलांचं अंत्यदर्शन घेऊन परीक्षा दिली, दहावीत मिळवले 92 टक्के

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2019 11:41 IST

कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळूनही परीक्षेत घवघवीत यश

गाझियाबाद: दहावीच्या परीक्षेआधी वडील आणि भाऊ गमावणाऱ्या टिया सिंहनं 92.4 टक्के गुण मिळवत घवघवीत यश मिळवलं. दहावीचा पहिला पेपर देण्याआधी टियाच्या वडिलांचा आणि भावाचा अपघाती मृत्यू झाला. घरावर दु:खाचा डोंगर कोसळला असताना टियानं परीक्षा दिली आणि आयुष्याच्या परीक्षेत उत्तीर्ण झाली. 6 मार्चला टियाचा भाऊ आणि वडील दुचाकीवरुन जेवण आणायला गेले होते. त्यांचा अपघात झाला. यात टियाचे वडील आणि भाऊ गंभीर जखमी झाले. दुसऱ्या दिवशी टियाचा दहावीचा पहिला पेपर होता. मात्र अपघातामुळे टिया आणि कुटुंबाची संपूर्ण रात्र रुग्णालय, शवागार आणि घर अशा धावपळीत गेली. सकाळी दु:ख बाजूला सारुन टिया परीक्षा देण्यासाठी गेली. सोमवारी परीक्षेचा निकाल आला. टियाला 92.4 टक्के गुण मिळाले. टियानं इंग्रजीत 99, समाजशास्त्रात 95, हिंदीत 90 आणि गणित आणि विज्ञानात प्रत्येकी 89 गुणांची कमाई केली. 'घरात दु:खाचं वातावरण होतं. संपूर्ण रात्र ती रडत होती. तिला जराही झोप लागली नाही. प्रकृती अतिशय गंभीर असलेल्या भावाला, वडिलांना भेटण्यासाठी ती रात्री रुग्णालयात गेली होती. तिनं मलाही वेळोवेळी आधार दिला आणि सकाळी परीक्षेला गेली,' अशा शब्दांत टियाची आई रिना सागर यांनी घडलेला प्रसंग सांगितला. 'पहिला पेपर देऊन ती परतली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या गर्वितची (टिनाचा भाऊ) आणि वडिलांची प्राणज्योत मालवली होती. परीक्षा देऊन आलेली टिना वडील आणि भावाच्या अंत्यविधीला उपस्थित होती. आदल्या रात्री वडिलांनी चांगला अभ्यास करण्याचा सल्ला दिला होता. तोच सल्ला लक्षात ठेवून तिनं सर्व पेपर दिले,' असं रिना म्हणाल्या. खडतर परिस्थिती मुलीनं मिळवलेल्या या यशाचा अभिमान वाटत असल्याची भावनादेखील त्यांनी व्यक्त केली.  

टॅग्स :CBSE Examसीबीएसई परीक्षा