शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

ंंंंसभापतींचे भवितव्य ठरविणारा गण

By admin | Updated: October 22, 2016 00:45 IST

हळगाव : सर्वसाधारण महिला राखीव

हळगाव : सर्वसाधारण महिला राखीव जामखेड : हळगाव गण सर्वसाधारण महिलांसाठी राखीव आहे. या गणातून निवडून येणारी महिला सभापतिपदाची दावेदार ठरण्याची शक्यता गृहीत धरून प्रमुख नेत्यांनी आपल्या सौभाग्यवतीला मैदानात उतरविण्यासाठी कंबर कसली आहे. त्यानुसार भेटीगाठी सुरू आहेत. तालुक्यातील एक गट व दोन गण कमी झाल्याने पूर्वीच्या अरणगावऐवजी हा नवीन गण तयार झाला. गणात सर्वच पक्षांतील धुरंधर नेते, प्रमुख कार्यकर्ते असल्याने राजकीयदृष्ट्या संवेदनशील आहे. जिल्हा बँकेचे संचालक व ज्येष्ठ काँग्रेस नेते जगन्नाथ राळेभात, जिल्हा परिषदेचे महिला बालकल्याण समितीच्या सभापती नंदा वारे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सूर्यकांत मोरे, काँग्रेस नेते व माजी पं. स. उपसभापती अंकुशराव ढवळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सचिव डॉ. भास्कर मोरे, रायुकाँचे तालुकाध्यक्ष बापूराव ढवळे, भाजयुमोचे अध्यक्ष काशिनाथ ओमासे, बाजार समितीचे संचालक करण ढवळे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते किसनराव ढवळे, अरणगावचे सरपंच लहू शिंदे, माजी सरपंच संतोष निगुडे असे दिग्गज असल्याने या गणाचे महत्त्व वाढले आहे. नव्या रचनेनुसार या गणात हळगाव, डोणगाव, अरणगाव, पारेवाडी, कवडगाव, गिरवली, हसनाबाद, पिंपरखेड, धानोरा, वंजारवाडी, बावी, फक्राबाद, खामगाव, पाटोदा, भवरवाडी, रत्नापूर, सांगवी, सरदवाडी, कुसडगाव, डिसलेवाडी, खांडवी, पाडळी अशी २२ गावे आहेत. या सर्वच गावांत प्रमुख चारही पक्षांचे नेते व कार्यकर्ते असल्यामुळे ग्रामपंचायत व सेवा संस्थेच्या निवडणुका चुरशीच्या होतात. राजकीयदृष्ट्या हा सक्षम गण विकासाबाबतही प्रगतशील आहे. हळगावला खाजगी साखर कारखाना आहे. नव्यानेच येथे पालकमंत्री राम शिंदे यांनी शंभर एकरांत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय कृषी महाविद्यालय आणले आहे. पाणलोट अंतर्गत व जलयुक्त शिवारच्या माध्यमातून मोठया प्रमाणावर कामे झाल्याने हा परिसर पाण्याने डबडबला आहे. या भागात दहा वर्षांपासून काँग्रेसचे प्राबल्य आहे. विद्यमान सदस्य शरद कार्ले आहेत. त्यापूर्वी काँग्रेसचे अंकुशराव ढवळे उपसभापती झाले होते. दहा वर्षांपासून हा गण भाजपला हुलकावणी देतो. गेल्या निवडणुकीतील या गटातील भाजप उमेदवार राजश्री सूर्यकांत मोरे गणातील उमेदवारीसाठी प्रमुख दावेदार आहेत. त्यांच्याखेरीज अमृता ढवळे, अनिता कार्ले, काँग्रेसकडून मंदाबाई राळेभात, राष्ट्रवादीकडून रत्नदीप फाउंडेशनच्या सचिव डॉ. वर्षा मोरे, पिंपरखेडच्या सरपंच कांचन ढवळे तयारीत आहेत. शिवसेना व मनसे या गणात ऐनवेळी उमेदवारी जाहीर करणार आहे.