शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
2
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
3
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
4
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
5
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
6
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
7
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
8
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
9
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
10
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
11
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
12
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
13
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
14
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
15
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
16
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
17
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
18
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
19
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
20
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत

मोदी सरकारचा मोठा निर्णय! 1 जानेवारी 2021 पासून सर्व चारचाकी वाहनांसाठी FASTag बंधनकारक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2020 09:32 IST

FASTags For All 4-wheelers from Jan 1, 2021: 1 जानेवारी 2021 पासून सर्व चारचाकी वाहनांसाठी FASTag बंधनकारक करण्यात आला आहे.

नवी दिल्ली - मोदी सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. 1 जानेवारी 2021 पासून सर्व चारचाकी वाहनांसाठी FASTag बंधनकारक करण्यात आला आहे. देशभरातील टोल नाक्यांवर (Toll Plaza)  डिजिटल आणि आयटी पेमेंट सिस्टमला चालना (Digital Payment) देण्यासाठी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय (MoRTH) ने निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता 1 जानेवारीपासून जुन्या गाड्यांना देखील फास्टॅग लावणे बंधनकारक आहे.  केंद्र सरकारच्या रस्ते परिवहन आणि राजमार्ग मंत्रालयाने या संदर्भात एक परिपत्रक काढलं आहे. M आणि N कॅटेगरीमधील वाहनांनादेखील फास्टॅगचा स्टीकर लावावा लागेल. केंद्र सरकारने सेंट्रल व्हेईकल रुल्समध्ये (CMVR, 1989) बदल केले आहेत.

जाणून घ्या, मोटर व्हेईकल नियम 1989 

नियमानुसार, 1 जानेवारी 2017 नंतर विकण्यात आलेल्या सर्व चारचाकी वाहनांना फास्टॅग असणं बंधनकारक होतं. त्यावेळी सर्व नव्या वाहनांना फास्टॅग बंधनकारक केला होता. फिटनेस सर्टिफिकेट रिन्यू करण्यासाठी फास्टॅग गरजेचा केला होता. गाडीला नॅशनल परमीट मिळण्यासाठीही फास्टॅग आवश्यक असेल असा नियम 1 ऑक्टोबर 2020 रोजी करण्यात आला होता. आता थर्ड पार्टी इशुरन्ससाठीदेखील फास्टॅग बंधनकारक करण्यात येणार आहे. 1 एप्रिल 2021 पासून हा निमय लागू होणार आहे. तुमच्या वाहनाला फास्टॅग लावल्यामुळे वेळेची आणि इंधनाची नक्कीच बचत होणार आहे. ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने फास्टॅग काढता येऊ शकतो.

फास्टॅग कसा काढायचा?

- फास्टॅग काढण्यासाठी देशातल्या 22 राष्ट्रीयकृत बँकांचा पर्याय देण्यात आला आहे. 

- या बँकांमध्ये जाऊन तुम्हाला फास्टॅग तुमच्या खात्याशी लिंक करता येईल. 

- बँकेचं खातं जोडताना केवायसी (Know Your Customer) असणं आवश्यक आहे. 

- Paytm, Amazon pay, Fino Payments Bank आणि Paytm Payments Bank या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरुनही तुम्ही फास्टॅग काढू शकता.

फास्टॅग रिचार्ज कसा करायचा?

- जर तुम्ही फास्टॅग बँक खात्यासोबत लिंक केलं असेल तर प्रीपेड वॉलेटमध्ये पैसे भरण्याची गरज नाही. 

- तुमच्या खात्यातून ती रक्कम वजा होईल. 

- फास्टॅगचं रिचार्ज तुम्ही UPI, Credit Card, Debit Card, Net Banking द्वारे वॉलेट रिचार्ज करू शकता.

एक फास्टॅग हा एका वाहनापेक्षा जास्त वाहनांना लावता येत नाही. दोन गाड्या असल्यास दोन वेगवेगळे फास्टॅग घ्यावे लागतील. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

टॅग्स :Indiaभारत