शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान
2
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
3
हुंड्यासाठी सुनेला मारहाण, खोलीत कोंडून विषारी साप सोडला; सासरच्यांनी गाठला क्रूरतेचा कळस
4
स्वप्नातील एसयूव्ही खरेदीची संधी! महिंद्रा स्कॉर्पिओ झाली ₹२.१५ लाखांनी स्वस्त; जाणून घ्या नवीन किंमत
5
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
6
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
7
नवरात्रीपासून GST चे नवे दर लागू होणार; कोणी टाळाटाळ केल्यास 'इथे' करा तक्रार; हेल्पलाइन नंबर जारी
8
नेपाळचे जेन-झी माजी पंतप्रधान ओलींचा पिच्छा सोडेनात! आता केली 'अशी' मागणी, म्हणाले...
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
10
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
11
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
12
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
13
Poonam Pandey: रामायणात पूनम पांडे रावणाच्या पत्नीच्या भूमिकेत, रामलीला कमिटी म्हणते- "तिला सुधरायचं आहे..."
14
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित
15
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
16
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
17
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
18
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
20
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम

जुळा भाऊ म्हणतो, माझ्यामुळे सापडला फारूख टकला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2018 12:40 IST

फारुख टकला याच्या जुळ्या भावाने माझ्यामुळे फारूख टकला पकडला गेला असा दावा न्यायालयात केला

मुंबई : 1993 मुंबई स्फोटातील मुख्य आरोपींपैकी एक मोहम्मद फारुख उर्फ फारुख टकला याला गुरूवारी दुबईहून भारतात आणण्यात आलं. त्याला न्यायालयाने 19 मार्चपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे. दुसरीकडे, त्याच्या जुळ्या भावाने माझ्यामुळे फारूख टकला पकडला गेला असा दावा न्यायालयात केला आहे. माझ्यामुळेच फारूख टकला भारतात आला आणि पकडला गेला असं त्याचा भाऊ  न्यायालयात म्हणाला.  यासिन मन्सूर मोहम्मद फारुख उर्फ फारुख टकला याला बॉम्बस्फोटांनंतर 25 वर्षांनी दिल्लीत अटक करण्यात आली. त्या बॉम्बस्फोटात 257 जण ठार व सुमारे 82 कोटी रुपयांचे नुकसान झाले होते. फारुख टकला दाऊदचा दुबईमधील कारभार सांभाळत होता.दोन भावांचा फिल्मी ड्रामा -  गुरुवारी संध्याकाळी 6.45 च्या सुमारास टकला याला न्यायालयात हजर करण्यात आले. या वेळी त्याचा जुळा भाऊ अहमद तेथेच तळ ठोकून होता. बॉम्बस्फोट मालिकेनंतर मुंबई पोलीस व सीबीआयने दोघांचाही शोध सुरू केला होता. यामध्ये मुंबईत असलेला अहमद याला अटक केली, तर फारुख टकला पसार झाला. पुढे अहमद या खटल्यातून सुटला. टकला न्यायालयात येताच अहमदने त्याची गळाभेट घेतली. दोघांनाही रडू कोसळले, तसेच सुनावणी दरम्यानही त्याने मध्येच टकलाला काही तरी सांगण्याचा प्रयत्न केला. तेव्हा न्यायाधीशाने त्याला दम भरला. त्यानंतर ‘गलती हो गयी’ म्हणून तो खाली बसला. त्यानंतर त्याला पुन्हा बोलण्याची संधी देण्यात आली त्यावेळी अहमद म्हणाला 'सर्व सीबीआय अधिकारी मला ओळखतात, माझ्यामुळेच फारूख भारतात आला. मला त्याची काळजी वाटते'.  त्यानंतर सीबीआयने न्यायालयाला अहमद मंसूरच्या मदतीनेच फारुखपर्यंत पोहोचू शकल्याचे सांगितल्यावर अहमदला चक्कर आली व तो खाली कोसळला.

  

टॅग्स :Farooq Taklaफारुख टकलाCrimeगुन्हा