शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Congress Bharat Jodo Yatra: भारत जोडो यात्रेत फारुख अब्दुल्लांची एंट्री, म्हणाले- 'देशाची एकता राखणे काळाची गरज आहे...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2022 13:55 IST

Congress Bharat Jodo Yatra: भारत जोडो यात्रा आज सकाळीच मध्य प्रदेशातील बुरहानपूर जिल्ह्यात दाखल झाली आहे. बोदर्ली गावात पोहोचताच राहुल गांधी यांची आरती करण्यात आली.

Congress Bharat Jodo Yatra: कन्याकुमारीतून सुरू झालेली काँग्रेसची 'भारत जोडो यात्रा' (Congress Bharat Jodo Yatra) जम्मू-काश्मीरमध्ये संपणार आहे. ही यात्रा जम्मू-काश्मीरमध्ये पोहोचल्यानंतर नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला (Farooq Abdullah) हेदेखील काँग्रेसच्या यात्रेत सहभागी होणार आहेत. खुद्द फारुख अब्दुल्ला यांनीच ही माहिती दिली. देशाची एकता आणि अखंडता राखणे ही काळाची गरज असल्याचे ते म्हणाले.

काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी कन्याकुमारी ते जम्मू-काश्मीरपर्यंत 'भारत जोडो यात्रा' सुरू केली आहे. सध्या ही यात्रा मध्य प्रदेशात असून, हळुहळू काश्मीरकडे जात आहे. दरम्यान, फारुख अब्दुल्ला यांनी मीडियाला सांगितले की, “लखनपूरपासून जम्मू-काश्मीर सुरू होते, यात्रा तिथे पोहोचल्यावर मी राहुल गांधींसोबत यात्रेत सहभागी होईल. देशाच्या एकात्मतेसाठी आणि अखंडतेसाठी आम्ही एकत्र येऊ. संघटित राहणे ही काळाची गरज आहे.” अब्दुल्ला सध्या संसदीय समितीच्या बैठकीसाठी नवी दिल्लीत आहेत.

भारत जोडो यात्रा सध्या मध्य प्रदेशात भारत जोडो यात्रा आज सकाळीच मध्य प्रदेशातील बुरहानपूर जिल्ह्यात दाखल झाली आहे. बोदर्ली गावात पोहोचताच या यात्रेचे जल्लोषात व पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले. गावात पोहोचल्यावर राहुल गांधी यांची आरती करण्यात आली. त्यांचे पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले. माजी मुख्यमंत्री आणि प्रदेश काँग्रेस अध्यक्ष कमलनाथ यांनी त्यांचे स्वागत केले. माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह, माजी केंद्रीय मंत्री अरुण यादव यांच्याशिवाय इतर सर्व नेते राहुल गांधींच्या दौऱ्यात सोबत आहेत.

टॅग्स :Farooq Abdullahफारुख अब्दुल्लाRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBharat Jodo Yatraभारत जोडो यात्रा