शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
4
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
5
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
6
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
7
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
8
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
9
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
10
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
11
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
12
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
13
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
14
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
15
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
16
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
17
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
18
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
19
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
20
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”

'दहशतवादी आणि भारतीय सैन्यात संगनमत', फारुख अब्दुल्ला यांचे वादग्रस्त वक्तव्य...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2024 19:37 IST

Farooq Abdullah Latest News: जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्लांनी भारतीय सैन्याच्या निष्ठेवर मोठा प्रश्न उपस्थित केला आहे.

Farooq Abdullah statement on Indian Army : वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत राहणारे जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी परत एकदा नवा वाद निर्माण केला आहे. पाकिस्तान सीमेवर देशाची सुरक्षा करणारे सैनिक आणि दहशतवाद्यांमध्ये संगनमत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच, सीमेवर मोठा बंदोबस्त असतानाही दहशतवादी घुसखोरी कशी करू शकतात? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. 

ते सर्व आमच्या विनाशासाठी एकत्र आले जम्मू-काश्मीरमध्ये आयोजित एका कार्यक्रमात बोलताना फारुख अब्दुल्ला म्हणाले की, 'आज आपल्या सीमेवर मोठ्या प्रमाणावर सैन्य तैनात केले जात आहे, ही कदाचित जगातील सर्वात मोठी तैनाती आहे. तरीही सीमेपलीकडून दहशतवादी आपल्या देशात घुसतात आणि कारवाया करुन निघून जातात. भारतीय सैन्य आणि दहशतवादी यांचे संगनमत आहे. त्यांना आमचा विनाश हवा आहे, म्हणूनच ते हा खेळ खेळत आहेत,' असा गंभीर आरोप त्यांनी यावेळी केला आहे.

अनंतनाग चकमकीनंतर फारुख अब्दुलांचे लाजिरवाणे वक्तव्यअनंतनागमध्ये शनिवारी दुपारी झालेल्या चकमकीनंतर फारुख अब्दुल्ला यांचे हे वक्तव्य आले आहे. या चकमकीत लष्कराचे दोन जवान शहीद झाले, तर एका नागरिकाचाही मृत्यू झाला. लष्कराच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुप्तचर माहितीच्या आधारे लष्कर, सीआरपीएफ आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी अनंतनागच्या अहलान भागात शोध मोहीम सुरू केली होती. या भागात दोन दहशतवादी लपल्याची बातमी आली होती.

"जोपर्यंत या महाघोटाळ्याची चौकशी होत नाही, तोपर्यंत मोदीजी...", खरगेंचा हल्लाबोल

शोध मोहिमेदरम्यान दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. या चकमकीत दोन जवान शहीद आणि दोन जखमी झाले आहेत. पाकिस्तानातील जैश-ए-मोहम्मद (JeM) या दहशतवादी संघटनेची कव्हर ऑर्गनायझेशन असलेल्या काश्मीर टायगर्सने या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. काश्मीर टायगर्सने एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, 'काश्मीरच्या स्वातंत्र्यापर्यंत हे युद्ध सुरूच राहील.'

टॅग्स :Farooq Abdullahफारुख अब्दुल्लाJammu Kashmirजम्मू-काश्मीरIndian Armyभारतीय जवानterroristदहशतवादी