शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली मॅच जिंकली
6
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
7
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
8
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
9
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
10
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
11
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
12
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
13
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
14
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
15
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
16
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
17
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
20
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video

शेतकरी करणार भाजपविरोधी प्रचार, टीकैत यांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2021 09:17 IST

राकेश टिकैत यांचा उत्तर प्रदेशातील मेळाव्यात इशारा

ठळक मुद्देया मेळाव्याला हापूर, अलिगढ व इतर भागातले शेतकरी मोठ्या संख्येने हजर होते. गेल्या नऊ महिन्यांपासून सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनातील उत्तर प्रदेशमधील हा सर्वात मोठा मेळावा होता

मुझफ्फरनगर : पुढच्या वर्षी होणाऱ्या उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकांत भाजपविरोधात जोरदार प्रचार करण्याचे आंदोलक शेतकऱ्यांनी ठरविले आहे, असे भारतीय किसान युनियनचे नेते व प्रवक्ते राकेश टिकैत यांनी सांगितले. मुझफ्फरनगर येथे रविवारी झालेल्या शेतकऱ्यांच्या विशाल मेळाव्यात हा निर्णय घेण्यात आला. येत्या २७ सप्टेंबरला देशव्यापी बंद पाळण्याचाही शेतकऱ्यांचा विचार आहे असेही टिकैत म्हणाले.

या मेळाव्याला हापूर, अलिगढ व इतर भागातले शेतकरी मोठ्या संख्येने हजर होते. गेल्या नऊ महिन्यांपासून सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनातील उत्तर प्रदेशमधील हा सर्वात मोठा मेळावा होता, नव्या कृषी कायद्यांविरोधातील आंदोलन  यापुढेही सुरू ठेवण्याचा निर्धार या शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे. मुझफ्फरनगर येथील मेळाव्याला अन्य शेतकरी नेतेही उपस्थित होते.  २८ ऑगस्ट रोजी हरयाणा पोलिसांनी कर्नाल येथे शेतकऱ्यांवर लाठीमार केला, त्यात १० शेतकरी जखमी झाले होते. त्यात एकाचा मृत्यूही झाला होता; पण ती व्यक्ती हृदयविकाराने मरण पावली, असा दावा पोलिसांनी केला होता. या लाठीमारीच्या निषेधासाठी देखील मुझफ्फरनगर येथे रविवारी विशाल मेळावा आयोजिण्यात आला होता. 

केंद्राच्या दुर्लक्षामुळेच शेतमालाच्या किमतीत घसरण : शरद पवारजुन्नर (जि. पुणे) : केंद्र सरकार कृषी क्षेत्राकडे लक्ष देत नसल्याने शेतमालाच्या किमती घसरतात. दलाल शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक करतात. यासाठी कठोर पावले उचलावी लागतील, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्र सरकारला लक्ष्य केले.जुन्नर येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने बसविण्यात आलेल्या सहकारमहर्षी शिवाजीराव महादेवराव तथा दादासाहेब काळे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण पवार यांच्या हस्ते करण्यात आले.

शेतकऱ्यांचे दु:ख जाणून घ्या : वरुण गांधीnनव्या कृषी कायद्यांविरोधातील शेतकऱ्यांचे दु:ख, वेदना सरकारने जाणून घेतली पाहिजे. त्यांना चर्चेसाठी पाचारण केले पाहिजे. nत्यातूनच शेतकऱ्यांबाबतची वस्तुस्थिती समजू शकेल, असे भाजपचे खासदार वरुण गांधी यांनी म्हटले आहे व आपल्या पक्षाला घरचा अहेर दिला आहे. nत्यांनी मुझफ्फरनगर येथे झालेल्या आंदोलक शेतकऱ्यांच्या विशाल मेळाव्याचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. वरुण गांधी यांनी अनेकवेळा या आंदोलनाच्या समर्थनार्थ ट्वीट केले आहेत.

टॅग्स :rakesh tikaitराकेश टिकैतFarmers Protestशेतकरी आंदोलन