शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

शेतकऱ्यांचे आज रेल रोको, शनिवारी यवतमाळात सभा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2021 06:35 IST

Farmers Protests : शेतकरी आंदोलनाचा आज ८४वा दिवस होता. दिल्लीच्या सीमांप्रमाणेच देशभर कृषी कायद्याबाबत शेतकऱ्यांना जागरूक करण्याची शेतकऱ्यांनी धडक मोहीम सुरू केली आहे.

- विकास झाडे

नवी दिल्ली : संयुक्त किसान मोर्चाने घोषित केल्याप्रमाणे गुरुवारी दुपारी १२ ते ४ या वेळेत रेल रोको आंदोलन करण्यात येत आहे. पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि उत्तर प्रदेशमध्ये हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी मोर्चातर्फे नियोजन करण्यात आले आहे. शेतकरी आंदोलनाचा आज ८४वा दिवस होता. दिल्लीच्या सीमांप्रमाणेच देशभर कृषी कायद्याबाबत शेतकऱ्यांना जागरूक करण्याची शेतकऱ्यांनी धडक मोहीम सुरू केली आहे. गुरुवारी देशभर रेल रोकाचे आवाहन करण्यात आले आहे, तर २० फेब्रुवारीला यवतमाळ इथे महापंचायत होत आहे. या सभेला मार्गदर्शन करण्यासाठी भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ता राकेश टिकैत आणि महासचिव युधवीर सिंह येत आहेत. यवतमाळच्या आझाद मैदानावर ही सभा होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘चाय पे चर्चा’ आयोजित करून शेतकऱ्यांची दिशाभूल केली होती. आता तेच शेतकरी मोदी यांची पोल खोलणार असल्याची माहिती भाकियुचे नेते धर्मेन्द्र मलिक यांनी दिली.

हल्लेखोर मूळचा पंजाबमधील...शेतकरी आंदोलनात सहभागी झालेल्या एका आंदोलकाने मंगळवारी रात्री पोलीस अधिकाऱ्यावर प्राणघातक हल्ला केला. हरप्रीत सिंह असे आरोपीचे नाव आहे. तो मूळचा पंजाबचा रहिवासी आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. हरप्रीतने मंगळवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास एका पोलीस कर्मचाऱ्याची कार पळवली होती. पोलिसांनी त्याचा पाठलाग केल्या. पोलीस पाठलाग करीत असल्याचे लक्षात येताच आरोपी मुबरका चौकात कार सोडून एक स्कूटी घेऊन पसार झाला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक आशिष दुबे यांनी त्याचा पाठलाग केला. हरप्रीतने त्यांच्यावर तलवारीने हल्ला चढवला. हल्ल्यातून दुबे थोडक्यात बचावले. मात्र त्यांच्या मानेवर तसेच बोटांवर किरकोळ इजा झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी आरोपीविरोधात हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलनYavatmalयवतमाळ