शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
2
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
3
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
4
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
5
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
6
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
7
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
8
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
9
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
10
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
11
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
12
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
13
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
14
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
15
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
16
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
17
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
18
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
19
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात 57 टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद; 49 जागांसाठी मतदान
20
बुलढाणा: आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक, संपूर्ण कुटुंब बेघर

शेतकरी ‘डब्ल्यूटीओ’ विरोधात उभे ठाकले; जागतिक व्यापार करारातून कृषी क्षेत्र बाहेर काढण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2024 10:01 AM

शेतकऱ्यांनी सोमवारी दुपारी १२ ते ३ यावेळेत ‘डब्ल्यूटीओ छोडो’ आंदोलन आयोजित करण्याची घोषणा केली होती.

अमृतसर/होशियारपूर/हिसार : संयुक्त किसान मोर्चाच्या (एसकेएम) नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी सोमवारी आपल्या आंदोलनातील नवे शस्त्र बाहेर काढून जागतिक व्यापार संघटनेच्या (डब्ल्यूटीओ) करारातून कृषी क्षेत्र बाहेर काढा, हा मुद्दा लावून धरला. पंजाब, हरयाणा आणि उत्तर प्रदेशात अनेक ठिकाणी ट्रॅक्टर उभे करून महामार्गांची कोंडी केली. 

शेतकऱ्यांनी सोमवारी दुपारी १२ ते ३ यावेळेत ‘डब्ल्यूटीओ छोडो’ आंदोलन आयोजित करण्याची घोषणा केली होती. राज्य आणि राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक विस्कळीत न होता ट्रॅक्टर पार्क करणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. परंतु, पंजाबच्या होशियारपूरमध्ये जालंधर-जम्मू राष्ट्रीय महामार्गासह अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी त्यांचे ट्रॅक्टर उभे केले. दोआबा किसान समितीचे प्रदेशाध्यक्ष जंगवीर सिंग चौहान यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी तांडा येथील ‘बिजली घर’ चौकातही ट्रॅक्टर रस्त्यावर उभे केले. एका मेळाव्याला संबोधित करताना चौहान यांनी ‘डब्ल्यूटीओ’च्या धोरणांवर टीका केली आणि ते शेतकरीविरोधी असल्याचे म्हटले आहे.

किसान युनियन (राजेवाल), बीकेयू (काडियान), बीकेयू (एकता उग्रहण) यासारख्या अनेक शेतकरी संघटनांच्या सदस्यांनी होशियारपूर-फगवाडा रोड, नसराला-तारागड रोड, दोसरका-फतेहपूर रोड, बुल्लोवाल-इलोवाल रोड आणि भुंगा येथे निदर्शने केली.

...म्हणून एमएसपी मिळत नाहीnअमृतसरमध्ये अजनाला, जंदियाला गुरू, रय्या आणि बियास येथे शेतकऱ्यांनी आपली वाहने महामार्गावर उभी केली. लुधियाना-चंडीगड रस्त्यावरही अशीची परिस्थिती होती. हरयाणाच्या हिसारमध्ये शेतकऱ्यांनी राज्य आणि राष्ट्रीय महामार्गावर ५० ठिकाणी ट्रॅक्टर उभे करून निषेध केला.nडब्ल्यूटीओच्या धोरणांमुळे सरकार सर्व पिकांवर एमएसपी देत नाही, असा दावा अखिल भारतीय किसान सभेचे (एआयकेएस) राज्य उपाध्यक्ष समशेर सिंग नंबरदार यांनी केला. nपश्चिम उत्तर प्रदेशात, भारतीय किसान युनियनने (बीकेयू) केलेल्या आवाहनानंतर ट्रॅक्टरसह शेतकऱ्यांनी निदर्शने केली आणि  प्रातिनिधिक पुतळ्यांचे दहन केले.

...ती आत्महत्या ठरेलशेतकऱ्यांनी कृषी क्षेत्राला डब्ल्यूटीओ करारातून बाहेर काढण्याची मागणी करत ‘डब्ल्यूटीओ’चे  प्रातिनिधिक पुतळे जाळले आणि घोषणाबाजी केली. १३व्या मंत्रिस्तरीय परिषदेसाठी अबूधाबी येथे १६४ डब्ल्यूटीओ सदस्य देशांचे व्यापार मंत्री एकत्र आले असताना निदर्शने करण्यात आली. डब्ल्यूटीओचे उद्दिष्ट शेती अनुदान संपवणे आहे. जर भारताने कृषी आघाडीवर डब्ल्यूटीओच्या धोरणांचे पालन केले तर ती आत्महत्या ठरेल,  असा इशारा शेतकरी नेत्यांनी दिला आहे. 

युरोप महासंघाच्या मुख्यालयाला ट्रॅक्टरने घेरावलालफितीचा कारभार आणि स्वस्त आयातीच्या स्पर्धेमुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी सोमवारी युरोप महासंघाच्या मुख्यालयाला ट्रॅक्टरसह घेराव घातला. शेतकऱ्यांना रोखण्यासाठी मुख्यालयाबाहेर काँक्रीट अडथळे आणि काटेरी तारा लावण्यात आल्या आहेत. इमारतीच्या मुख्य प्रवेशद्वारावर पोलिस गस्त घालत होते. येथे २७-राष्ट्रीय गटांचे कृषिमंत्री एकत्र येत आहेत.आंदोलकांनी शेतकरी हळूहळू संपत असल्याचा आरोप केला. ‘लहानपणी तुम्ही शेती करण्याचे स्वप्न पाहतात, आणि प्रौढ झाल्यावर तुम्ही त्यात मरतात,’ अशी प्रतिक्रिया एकाने व्यक्त केली. शेतकऱ्यांनी युरोप महासंघाच्या मुख्यालय इमारतीपासून काहीशे मीटर अंतरावर टायर आणि रबराचे ढिगारे पेटवले. महिन्याच्या सुरुवातीला अशाच प्रकारची हिंसक निदर्शने झाली होती. त्या वेळी युरोप महासंघ नेत्यांच्या शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी गवताच्या गाठी जाळल्या आणि अंडी, फटाके पोलिसांवर फेकले होते. संपूर्ण युरोपमधील शेतकऱ्यांचे निषेध मोर्चे आणि निदर्शनांच्या मालिकेत आता ब्रुसेल्स येथील निदर्शनांची भर पडली आहे. 

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलन