शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
2
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
3
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
4
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
5
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
6
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
7
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
8
Giriraj Singh : "ममता बॅनर्जींनी बांगलादेशात जाऊन पंतप्रधान व्हावं"; घुसखोरांवरुन गिरिराज सिंह यांचा खोचक टोला
9
Mehbooba Mufti: "गांधी- नेहरूंचा हिंदुस्थान आता 'लिंचिस्तान' झालाय!", मेहबूबा मुफ्तींचा केंद्र सरकारवर प्रहार
10
जेवण आणि झोप यामध्ये नेमकं किती अंतर असावं? निरोगी आयुष्यासाठी पाळा 'हा' सोपा नियम
11
सावधान! तुमची एक छोटी चूक आणि बँक खाते रिकामे; UPI वापरताना 'हे' ५ डिजिटल नियम पाळणे आता अनिवार्य
12
'बंकरमध्ये लपण्याची वेळ आलेली...', ऑपरेशन सिंदूरवर पाकिस्तानी राष्ट्रपती झरदारींचा मोठा खुलासा
13
Navneet Rana: "अजित पवारांचं भाजपसोबत जाणं, हा शरद पवारांचाच प्लॅन!" नवनीत राणा असं का म्हणाल्या?
14
"गिरीजा ओकला पाहून इम्रान हाश्मीही झालेला दंग", प्रसिद्ध निर्मातीने सांगितला 'तो' किस्सा
15
"गौतम अदानी हे माझ्या मोठ्या भावासारखे, ते हक्काने मला रागवतात"; सुप्रिया सुळेंनी व्यक्त केल्या भावना
16
नव्या पर्वाला सुरुवात; मुंबई महानगरपालिकेसाठी काँग्रेस-‘वंचित’ची आघाडी, जागावाटपही ठरले!
17
वृद्धापकाळाची चिंता सोडा! एलआयसीच्या 'या' योजनेत एकदा गुंतवा आणि आयुष्यभर मिळवा पेन्शन
18
Malegaon Municipal Corporation Election : जमलं तर आघाडी; नाहीतर काँग्रेस स्वबळावर; एमआयएमबरोबर फिस्कटले, ९ उमेदवारांची घोषणा
19
अभिमानास्पद! जुन्या कागदांपासून पेन्सिल बनवणारं यंत्र; कोण आहे राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेती?
20
१२२ षटकार, १४८८ धावा... रोहित शर्मा, विराट कोहली नव्हे तर 'या' पठ्ठ्याने गाजवलं २०२५चं वर्ष
Daily Top 2Weekly Top 5

गारपीटग्रस्त शेतकर्‍यांचे अनुदानासाठी साकडे शेतकरी उद्ध्वस्त : पंचनामे करूनही दमडीही नाही

By admin | Updated: July 11, 2015 00:31 IST

नाशिक : सटाणा तालुक्यातील धांद्री येथे नोव्हेंबर ते मार्च पाच महिने सलग गारपीट व अवकाळी पावसाने झोडपून काढल्याने शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त झाले, त्यांच्या पिकांचे पंचनामे करण्यात आले परंतु शासकीय मदतीची भरपाई अद्याप मिळालेली नसल्याने शुक्रवारी शेकडो शेतकर्‍यांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठून आपली कैफियत मांडली. विशेष म्हणजे मार्च महिन्यात गारपिटीत प्रचंड नुकसान झालेले असताना शासनाने अनुदानाची पूर्ण रक्कमच अद्याप शेतकर्‍यांना उपलब्ध करून दिलेली नाही.

नाशिक : सटाणा तालुक्यातील धांद्री येथे नोव्हेंबर ते मार्च पाच महिने सलग गारपीट व अवकाळी पावसाने झोडपून काढल्याने शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त झाले, त्यांच्या पिकांचे पंचनामे करण्यात आले परंतु शासकीय मदतीची भरपाई अद्याप मिळालेली नसल्याने शुक्रवारी शेकडो शेतकर्‍यांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठून आपली कैफियत मांडली. विशेष म्हणजे मार्च महिन्यात गारपिटीत प्रचंड नुकसान झालेले असताना शासनाने अनुदानाची पूर्ण रक्कमच अद्याप शेतकर्‍यांना उपलब्ध करून दिलेली नाही. या संदर्भात शेतकर्‍यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नोव्हेंबर व डिसेंबर २०१४ मध्ये धांद्री व परिसरातील गावांमध्ये प्रचंड गारपीट होऊन खरिपाची पिके नष्ट झाली, तर जे काही बचावले त्यांचे प्रचंड नुकसान झाले. या नुकसानीचे पंचनामे शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून करण्यात आले व त्यानंतर शासनाने गारपीटग्रस्तांना आर्थिक मदतीचे वाटप केले. या मदतीवर शेतकरी थोडा उभा राहिला व पुन्हा त्याने पिके घेण्यास सुरुवात करताच, मार्चमध्ये पुन्हा गारपीट झाली. त्यावेळी सर्व पिके हातची गेली. वादळी वारा व गारपिटीमुळे शेतकर्‍यांच्या घरांची पडझड होऊन मोठे नुकसान सोसावे लागले. शासनाने नुकसानग्रस्तांचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आल्यावर पंचनामेही करण्यात आले. परंतु शासनाने ज्यांना नोव्हेंबर महिन्यात अनुदान दिले त्यांना मार्चमध्ये झालेल्या नुकसानग्रस्तांना मदत न देण्याचा निर्णय घेतल्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. ज्या शेतकर्‍यांचे पंचनामे झाले आहेत तसेच ज्यांच्या घरांची पडझड झाली त्यांना त्वरित नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी करून लगतच्या गावातील शेतकर्‍यांना मात्र नुकसान भरपाईची रक्कम देण्यात आली, पण आम्हाला नाही अशी तक्रारही त्यांनी केली. यावेळी उपजिल्हाधिकारी नीलेश जाधव यांना निवेदन देण्यात आले, प्रसंगी गजेंद्र चव्हाण, बहिणाजी धोंडू चव्हाण, सुरेश चव्हाण, शिवाजी चव्हाण, पोपट चव्हाण, अशोक देवरे, विश्वास चव्हाण, बाळू चव्हाण, सुदाम पवार आदि उपस्थित होते.