शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

आता लढाई 'आर-या-पार'! शेतकऱ्यांनी मोदी सरकारचा प्रस्ताव फेटाळला; आंदोलन आणखी तीव्र होणार

By मोरेश्वर येरम | Updated: December 9, 2020 18:05 IST

दिल्लीत शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींनी पत्रकार परिषद घेतली. सरकारकडून आलेल्या अहवालाची शेतकऱ्यांनी सविस्तर माहिती दिली.

ठळक मुद्देकृषी विधेयकं मागे घेत नाही तोवर आंदोलन सुरुच राहणार१४ डिसेंबर रोजी देशभरातील जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाजिओच्या सीमवर बहिष्कार घालण्याचं शेतकऱ्यांचं आवाहन

दिल्लीनव्या कृषी कायद्यांमधील बदल करण्याचा केंद्र सरकारने पाठवलेला लेखी प्रस्ताव शेतकऱ्यांनी फेटाळून लावला आहे. कृषी कायदे पूर्णपणे रद्द करण्याच्या भूमिकेवर आम्ही ठाम असून यापुढील काळात सरकारविरोधातील आंदोलन आणखी तीव्र करणार असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे. 

दिल्लीत शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींनी पत्रकार परिषद घेतली. सरकारकडून आलेल्या अहवालाची शेतकऱ्यांनी सविस्तर माहिती दिली. "केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबतच्या दोन तासांच्या बैठकीत त्यांनी फक्त गेल्या पाच बैठकींमध्ये झालेली माहिती दिली. सरकारकडून आम्हाला फक्त गोलगोल फिरवण्याचं काम केलं जातंय. सरकारने पाठवलेला प्रस्ताव आम्ही फेटाळून लावण्याचा निर्णय घेतला आहे आणि जोवर कायदे पूर्णपणे रद्द होत नाहीत. तोवर आंदोलन सुरुच राहणार आहे", अशी माहिती शेतकरी संघटनेच्या नेत्याने पत्रकार परिषदेत दिली. 

आंदोलन आणखी तीव्र होणारकेंद्राने दिलेला प्रस्ताव फेटाळून लावल्यानंतर आंदोलनाची पुढची दिशा देखील शेतकऱ्यांनी स्पष्ट केली. यात अनेक मुद्द्यांवरुन सरकारची कोंडी करण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी केला आहे. येत्या १२ डिसेंबर रोजी संपूर्ण देशात टोलप्लाझा बंद पाडण्यात येणार आहेत. तसेच दिल्ली-जयपूर आणि दिल्ली-आग्रा हायवे जाम करण्यात येणार असल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं. 

रिलायन्स आणि अदानीवर बहिष्कारसरकारची आर्थिक कोंडी करण्याच्या दृष्टीकोनातून शेतकऱ्यांनी देशभर रिलायन्सच्या सर्व प्रोडक्ट्सवर बंदी घालण्याचं आवाहन  जनतेला केलं आहे. यासोबत रिलायन्स जिओच्या सीमकार्डवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला आहे. देशभर रिलायन्स आणि अदानीशी निगडीत मॉल्सवरही बहिष्कार टाकण्यात येणार असल्याचं शेतकरी नेत्यांनी सांगितलं. 

१४ डिसेंबरला देशभर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चायेत्या १४ डिसेंबर रोजी देशभरातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी केला आहे. देशात ठिकठिकाणी या दिवशी निदर्शनं आणि धरणे आंदोलन देखील केलं जाणार असल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं आहे. 

टॅग्स :Farmer strikeशेतकरी संपdelhiदिल्ली