शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

गाझीपूर सीमेवर पोहोचले शेतकरी, हरियाणाच्या सर्वात मोठ्या शेतकरी संघटनेचा आंदोलनाला पाठिंबा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2024 17:25 IST

विविध मागण्यासांठी शेतकऱ्यांनी पुकारलेले आंदोलन आज तिसऱ्या दिवशीही सुरू आहे.

Farmer Protest: एमएसपीसह विविध मागण्यांसाठी राजधानी दिल्लीकडे निघालेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा आज तिसरा दिवस आहे. हरियाणा-पंजाब सीमेवर मोठ्या प्रमाणात शेतकरी जमा झाले आहेत. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीला लागून असलेल्या हरियाणा आणि यूपीच्या सीमेवर पोलिसांचा कडक बंदोबस्त आहे. शेतकऱ्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी ठिकठिकाणी बॅरिकेड्स लावले आहेत. शेतकऱ्यांचे आंदोलन रोखण्यासाठी सरकारने अनेकदा चर्चा केली, पण ती निष्फळ ठरली.

दरम्यान, गुरुवारी पहिल्यांदाच यूपीचे शेतकरी आंदोलनात सहभागी होण्यासाठी दिल्लीकडे निघाले, मात्र पोलिसांनी त्यांना वाटेतच अडवून बसमध्ये बसवले. हे शेतकरी गॅस सिलिंडर आणि रेशन घेऊन यूपीमधील गाझियाबादहून गाझीपूर सीमेवर पोहोचले होते. पोलिसांनी कायदेशीर कारवाईनंतर त्या शेतकऱ्यांना सोडून दिले.

बीकेयू चाधुनी यांचा आंदोलनाला पाठिंबा हरियाणातील सर्वात मोठी शेतकरी संघटना भारतीय किसान युनियन (चाधुनी) ने या आंदोलनाला पाठिंबा देण्याची घोषणा केली आहे. मात्र, संघटना शंभू सीमेपर्यंत मोर्चा काढणार नाही. संघटनेच्या वतीने 16 फेब्रुवारी रोजी हरियाणातील सर्व टोलनाके मोफत ठेवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. हरियाणातील सर्व टोलनाके दुपारी 12 ते 3 या वेळेत मोफत असतील. 17 फेब्रुवारी रोजी जिल्हा मुख्यालयावर ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात येईल. 18 फेब्रुवारी रोजी कुरुक्षेत्र येथे बैठक घेऊन सर्व शेतकरी संघटनांना आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येणार आहे.

शेतकऱ्यांच्या मागण्या 1. सर्व पिकांच्या खरेदीसाठी एमएसपी हमी कायदा करण्यात यावा.2. डॉ.स्वामिनाथन आयोगाच्या अहवालानुसार पिकांचे भाव ठरवावेत.3. शेतकरी आणि शेतमजुरांचे कर्ज माफ करावे. 4. 60 वर्षांवरील शेतकऱ्यांना 10,000 रुपये पेन्शन देण्यात यावी.5. भूसंपादन कायदा 2013 पुन्हा लागू करावा.6. लखीमपूर खेरी घटनेतील दोषींना शिक्षा झाली पाहिजे.7. मुक्त व्यापार करारांवर बंदी घालावी.8. वीज दुरुस्ती विधेयक 2020 रद्द करण्यात यावे.9. मनरेगा अंतर्गत दरवर्षी 200 दिवसांचे काम आणि 700 रुपये मजुरी देण्यात यावी.10. शेतकरी आंदोलनात शहीद झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना भरपाई आणि सरकारी नोकऱ्या द्याव्यात. 11. बनावट बियाणे, कीटकनाशके आणि खते विकणाऱ्या कंपन्यांवर कठोर कायदे करावेत. 12. मिरची, हळद आणि इतर मसाल्यांसाठी राष्ट्रीय आयोगाची स्थापना करावी.13. संविधानाची 5वी अनुसूची लागू करून आदिवासींच्या जमिनींची लूट थांबवावी.

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलनFarmer strikeशेतकरी संपdelhiदिल्लीBJPभाजपाPunjabपंजाबHaryanaहरयाणा