शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

'गडचिरोलीतील नक्षलवाद्यांना समर्थन करणाऱ्यांचे फोटो दिल्लीतील आंदोलनात कसे?'

By महेश गलांडे | Updated: February 2, 2021 12:18 IST

शेतकरी आंदोलनामध्ये प्रजासत्ताकदिनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीत मोठा हिंसाचार झाला. अनेक आंदोलक लाल किल्ला परिसरात शिरले व त्यांनी तिथे काही ध्वज फडकावले.

ठळक मुद्देगडचिरोलीतील नक्षलवाद्यांना समर्थन देणाऱ्या काही लोकांना पोलिसांनी अटक केली आहे, न्यायालयानेही जामीन देण्यास नकार दिला आहे. या आंदोलनात त्यांचे फोटोही दिसले. मग, शेतकरी आंदोलनात हे कसे आले? असा सवाल गडकरी यांनी विचारला आहे

नवी दिल्ली - प्रजासत्ताकदिनी दिल्लीत तिरंगा राष्ट्रध्वजाचा अवमान झाल्याने सारा देश दु:खी आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. यावर्षीच्या पहिल्या ‘मन की बात’ कार्यक्रमात रविवारी ते बोलत होते. त्यानंतर, आता केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनीही दिल्लीतील शेतकरी आंदोलनावर भाष्य केलंय. दिल्लीतील शेतकरी आंदोलकांनी आपली विश्वासर्हता गमावल्याचं गडकरी यांनी म्हटलंय. नितीन गडकरी यांनी अर्थसंकल्पाविषयीही आपलं मत मांडलं. यावेळी, अर्थसंकल्पाचे आणि स्क्रॅप पॉलिसीचं कौतुकही केलं. 

शेतकरी आंदोलनामध्ये प्रजासत्ताकदिनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीत मोठा हिंसाचार झाला. अनेक आंदोलक लाल किल्ला परिसरात शिरले व त्यांनी तिथे काही ध्वज फडकावले. या आंदोलकांनी तिरंगा राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याचाही आरोप झाला होता. त्या पार्श्वभूमीवर मोदींनी, सारा देश दु:खी झाल्याचे उद्गार काढले आहेत. त्यानंतर, आता नितीन गडकरी यांनीही दिल्ली आदोलनात 26 जानेवारी रोजी जे घडलं ते निश्चितच राजकीय षडयंत्र होतं, असे ते म्हणाले. प्रजासत्ताक दिनी दिल्लीतील लाल किल्ल्यावर जो प्रकार घडला, तो पूर्णपणे राजकीय षडयंत्रच होते. आंदोलनात काही देशद्रोही घटकांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनात घुसखोरी केली होती. त्यामुळे, 26 जानेवारीच्या घटनेनंतर शेतकरी आंदोलकांनी विश्वासर्हता गमावली आहे, असे गडकरी यांनी इंडिया टीव्हीशी बोलताना म्हटलंय. 

गडचिरोलीतील नक्षलवाद्यांना समर्थन देणाऱ्या काही लोकांना पोलिसांनी अटक केली आहे, न्यायालयानेही जामीन देण्यास नकार दिला आहे. या आंदोलनात त्यांचे फोटोही दिसले. मग, शेतकरी आंदोलनात हे कसे आले? असा सवाल गडकरी यांनी विचारला आहे. लाल किल्ल्यावरील घटनेमुळे शेतकरी आंदोलनाचेच सर्वात मोठे नुकसान झालंय. कारण, आंदोलक शेतकऱ्यांच्या विश्वासर्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय, तसेच शेतकरी आंदोलनाची सहानुभूतीही संपली. पंतप्रधान मोदींसर, कृषीमंत्री नरेंद्र तोमर यांनीही शेतकऱ्यांशी संवाद, चर्चा करायला तयार आहे. या चर्चेतून नक्कीच मार्ग निघेल, असेही गडकरी यांनी म्हटलंय.   

स्कॅपिंग पॉलिसीमुळे 50 हजार जॉबची निर्मित्ती

स्क्रॅपिंग पॉलिसीमुळे अॅटोमोबाईल इंडस्ट्रीला चालना मिळणार आहे. कारण, 20 वर्षांत जुनी गाडी स्क्रॅप झाल्यानंतर नवीन गाडी घेणारच आहोत. देशात एकूण 1 कोटींपेक्षा जास्त गाड्या प्रदुषण करत होत्या, तसेच जास्तीचं पेट्रोलही खात होत्या. या गाड्या 10 ते 12 टक्क्यांनी जास्त प्रदुषण करत होत्या. त्यामुळे पहिला फायदा हा प्रदुषण कमी होईल. स्क्रॅपिंग मटेरियलचं रिसायकलींग होईल. मी कॉलेजमध्ये असताना स्कुटर खरेदी केली होती, त्यावेळी 32 किमीचा एव्हरेज ती देत होती. आता, आपण जी दुचाकी गाडी चालवतो ती 80 किमी एव्हरेज देते. याचाच अर्थ जुनं जाऊन नवीन आल्यानं फायदाच होईल, असे फायदे नवीन स्क्रॅप पॉलिसीचे गडकरी यांनी सांगितले आहेत. सरकारच्या या नवीन पॉलिसीमुळे देशात 50 हजार जॉब निर्माण होतील, तसेच 10 हजार कोटींची गुंतवणूकही होईल. आजपासून 15 दिवसांत मी स्क्रॅपिंग पॉलिसी जाहीर करणार असल्याचे नितीन गडकरी यांनी सांगितले. 

राकेश टिकेत म्हणतात...

"देशाचा राष्ट्रध्वज हा फक्त पंतप्रधानांचा आहे का? संपूर्ण देशाचं राष्ट्रध्वजावर प्रेम आहे. ज्यानं देशाच्या ध्वजाचा अपमान केला आहे. त्याला अटक करा", असं शेतकरी आंदोलनाचे नेते राकेश टिकैत यांनी म्हटलं आहे. नव्या कृषी कायद्यांसंदर्भात सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये पुन्हा चर्चेला सुरुवात होणार का? याबाबत विचारलं असता टिकैत यांनी बंदुकीच्या धाकाखाली चर्चा होणं शक्य नाही असं म्हटलं आहे.  

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीdelhi violenceदिल्लीFarmerशेतकरीFarmer strikeशेतकरी संप