शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

Farmers Protest: सत्ता तुमच्या डोक्यात गेलीय; संघाच्या नेत्यानं कृषिमंत्री तोमर यांना सुनावलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2021 07:41 IST

शेतकरी आंदाेलनावर केली फेसबुक पाेस्ट

भाेपाळ : केंद्रीय कृषी कायद्यांच्या विराेधात सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदाेलनावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते रघुनंदन शर्मा यांनी केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह ताेमर यांच्यावर टीका केली आहे. सत्ता डाेक्यात गेल्याची टीका शर्मा यांनी केली असून, देश बळकट करण्याच्या दिशेने काम करण्याचा सल्लाही त्यांनी ताेमर यांना दिला आहे.शर्मा यांनी फेसबुकवर एक पाेस्ट टाकली असून, त्यातून त्यांनी ताेमर यांच्या कार्यशैलीवर जाेरदार टीकास्त्र साेडले आहे. त्यांनी ताेमर यांना उद्देशून लिहिले की, तुम्ही सरकारमध्ये सहभागी आहात. शेतकऱ्यांना मदत करण्याचा तुमचा हेतू असायला हवा. मात्र, तसे हाेताना दिसत नाही. त्यांना तुमची मदत नकाे असल्यास हा चांगुलपणा काय कामाचा? त्यांना तसेच राहायचे असेल तर बळजबरी करून काय उपयाेग हाेणार आहे. आज सत्ता तुमच्या डाेक्यात गेली आहे. तुम्ही जनाधार का गमावत आहात? काॅँग्रेसची धाेरणे आपण राबवत असून, ते आपल्या हिताचे नाही, असे खडे बाेल शर्मा यांनी सुनावले आहेत. राष्ट्रीयत्व बळकट करण्यासाठी सर्वताेपरी प्रयत्न करा अन्यथा आपल्याला पश्चाताप करावा लागेल. तुम्ही तुमच्या यशाची फळे चाखत आहात, असे वाटत असेल तुम्ही चुकत आहात. शेतकऱ्यांना  शांततेत निदर्शने करू द्यावीतवॉशिंग्टन : नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकऱ्यांना मोदी सरकारने शांततापूर्ण निदर्शने करू द्यावीत, त्यांना आंदोलनस्थळी इंटरनेटही उपलब्ध असावे, असे अमेरिकी काँग्रेसच्या भारतविषयक समितीने म्हटले आहे.भारतात सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत अमेरिकी काँग्रेसच्या भारतविषयक समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत चर्चा झाली. अमेरिकी काँग्रेसचे सदस्य ब्रॅड शेर्मन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला रिपब्लिकन पक्षाचे लोकप्रतिनिधी स्टीव्ह चॅबॉट तसेच अमेरिकी काँग्रेस सदस्य आर. ओ. खन्ना हे उपस्थित होते. हक्कांची गळचेपी नको : संयुक्त राष्ट्रेनव्या कृषी कायद्याच्या विरोधात आंदोलन करण्याचा हक्क शेतकऱ्यांना बजावू द्यावा, त्यांच्या मानवी हक्कांची गळचेपी करू नये असे संयुक्त राष्ट्रांच्या मानवी हक्कविषयक विभागाने भारताला सांगितले आहे. शांततापूर्ण आंदोलन करणे हा प्रत्येकाचा व शेतकऱ्यांचा हक्क आहे, असे संयुक्त राष्ट्रांनी म्हटले आहे.

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलनRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ