शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

Farmers Protest: शेतकऱ्यांच्या भारत बंदचा पंजाब, हरयाणात प्रभाव; अन्यत्र संमिश्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2021 06:13 IST

सामान्य व्यवहारांपासून तर मोठ्या मंडई बंद ठेवण्यात आल्या. दिल्लीच्या सीमांवर रहदारीचे दोन्ही मार्ग शेतकऱ्यांनी रोखले,

विकास झाडेनवी दिल्ली : कृषी कायद्याच्या विरोधात संयुक्त किसान मोर्चाने पुकारलेल्या भारत बंदला देशात संमिश्र प्रतिसाद मिळाला. हरयाणपंजाब आणि उत्तर प्रदेशच्या काही भागांत या बंदचा प्रभाव दिसून आला. दिल्लीच्या सीमेवर केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला शुक्रवारी १२० दिवस पूर्ण झाले. तिन्ही कृषी कायदे रद्द करा, मालास किमान आधारभूत किंमत द्या, आंदोलक शेतकऱ्यांवरचे सर्व खटले रद्द करा, डिझेल, पेट्रोल आणि गॅसदर कमी करा आदी मागण्या आज शेतकऱ्यांनी केल्या.

सामान्य व्यवहारांपासून तर मोठ्या मंडई बंद ठेवण्यात आल्या. दिल्लीच्या सीमांवर रहदारीचे दोन्ही मार्ग शेतकऱ्यांनी रोखले, त्यामुळे लोकांची गैरसोय झाली. ओखला, गाझीपूर आणि आझादपूरच्या भाजी मंडई बंद ठेवण्यात आल्या होत्या. सकाळपासूनच गाझीपूरचे रहदारीचे दोन्ही मार्ग शेतकऱ्यांनी बंद केले. गाझीपूर, टिकरी आणि सिंधू सीमेवर शेतकऱ्यांनी निषेध व घोषणाबाजी केली. अनेक ठिकाणी नृत्य आणि गाण्याने वातावरण निर्मिती करण्यात आली. आजच्या भारत बंदची सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे त्यात सर्वसामान्यांचा खूप सहभाग होता. 

बिहारमध्ये २० जिल्ह्यांत आंदोलनाची तीव्रता काही ठिकाणी मात्र शेतकऱ्यांनी रेल्वे ट्रॅक अडवला. शेतकरी नेते युद्धवीर सिंग यांना गुजरात येथे पोलिसांनी अटक केली. बिहारमध्ये २० जिल्ह्यांमध्ये भारत बंद आंदोलनाची तीव्रता होती. पंजाबमध्ये २०० पेक्षा अधिक ठिकाणी शेतकऱ्यांनी निदर्शने केली. राजस्थान, कर्नाटक, आंध्र प्रदेशातही शेतकऱ्यांच्या बंदला उत्स्फूर्त पाठिंबा मिळाला. महाराष्ट्र, मध्यप्रदेशात आंदोलनाची तीव्रता नव्हती.  

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलन