शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

हरियाणाच्या कुरुक्षेत्रमध्ये MSP साठी शेतकऱ्यांचे आंदोलन; दिल्ली हायवे रोखला, पोलीस तैनात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2023 15:55 IST

महामार्गावर मोठ्या संख्येने शेतकरी जमा झाले असून, पोलिसही तैनात करण्यात आले आहेत.

Farmers Protest: पिकांची किमान आधारभूत किंमत(MSP) ठरवावी या मागणीसाठी कुरुक्षेत्रात शेतकरी नेते आणि प्रशासकीय अधिकारी, यांच्यातील चर्चा निष्फळ ठरली आहे. चर्चा निष्फळ ठरल्यानंतर कुरुक्षेत्र जिल्ह्यातील पिपली गावात आयोजित 'महापंचायत'मध्ये शेतकऱ्यांनी राष्ट्रीय महामार्ग 44 रोखण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, शेतकऱ्यांनी दिल्लीला जाणारा राष्ट्रीय महामार्ग रोखला आहे. गर्दी टाळण्यासाठी दिल्ली-चंदीगड मार्गावरील वाहतूक वळवण्यात आली आहे.

हरियाणातील शेतकरी सूर्यफूल पिकाच्या खरेदीत किमान आधारभूत किंमत ठरवण्याची मागणी कर आहेत. एमएसपीच्या अंमलबजावणीसाठी शेतकऱ्यांची निदर्शने सुरू आहेत. हरियाणा, पंजाब, यूपी आणि इतर शेजारील राज्यांतील शेतकरी नेते त्यांच्या मागणीसाठी 'एमएसपी दिलाओ, किसान बचाओ' महापंचायतीसाठी पिपली धान्य मार्केटमध्ये जमले होते. यावेळी चर्चा निष्फळ ठरल्यामुळे शेतकरी कुरुक्षेत्रहून दिल्लीच्या दिशेने निघाले आहेत.

शेतकऱ्यांची मागणी काय?मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी शनिवारी 8,528 शेतकऱ्यांना भावांतर भरपाई योजनेअंतर्गत (BBY) 36,414 एकर क्षेत्रात घेतलेल्या सूर्यफूल पिकासाठी 29.13 कोटी रुपये वितरित केले. राज्य सरकारने या वर्षाच्या सुरुवातीला बीबीवाय अंतर्गत सूर्यफूल पिकाचा समावेश करण्याची घोषणा केली होती. ही एक अशी योजना आहे, ज्याद्वारे सरकार MSP खाली विकल्या गेलेल्या उत्पादनासाठी शेतकऱ्यांना निश्चित नुकसान भरपाई देते. एमएसपीपेक्षा कमी विकल्या जाणाऱ्या सूर्यफूल पिकांसाठी राज्य सरकार अंतरिम मदत म्हणून प्रति क्विंटल रुपये 1,000 देत आहे. पण, राज्य सरकारने 6,400 रुपये प्रति क्विंटल या एमएसपीवर सूर्यफुलाची खरेदी करावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

गेल्या आठवड्यात शेतकऱ्यांवर लाठीचार्ज याच मागणीसाठी यापूर्वी 6 जून रोजी कुरुक्षेत्रच्या शहााबादमध्ये शेतकऱ्यांनी निदर्शने केली होती. त्यानंतर पोलिसांनी शेतकऱ्यांवर लाठीचार्ज केला. गुरुनाम सिंग चधुनी यांच्यासह अनेक शेतकरी नेत्यांना अटक करण्यात आली. सध्या दिल्ली-चंदीगड महामार्गावर मोठ्या संख्येने शेतकरी जमा झाले आहेत. येथे मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलिसांकडून कोणतीही कारवाई झालेली नाही. शांततेत आंदोलन सुरू असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. 

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलनFarmerशेतकरीFarmer strikeशेतकरी संपdelhiदिल्ली