शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
2
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
3
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
4
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
5
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
6
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
7
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
8
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
9
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
10
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
11
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
12
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
13
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
14
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
15
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
16
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
17
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
18
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
19
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
20
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल

Farmers Protest : 6 फेब्रुवारीला देशभर चक्का जाम, किसान मोर्चाची घोषणा

By श्रीकृष्ण अंकुश | Updated: February 2, 2021 09:26 IST

शेतकरी संघटनांनी कृषी कायद्यांना विरोध दर्शवत महात्मा गांधी यांच्या पुन्यतिथी दिनी 30 जानेवारीला दिवसभर उपवास केला होता. तसेच 26 जानेवारीला दिल्ली येथे ट्रॅक्टर परेडदेखील काढली होती. मात्र, यावेळी काही लोकांनी दिल्लीच्या काही भागात मोठ्या प्रमाणावर धुडगूस घातला होता. 

नवी दिल्ली - केंद्राने आणलेल्या नव्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या वेशीवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. यातच आता किसान मोर्चाकडून 6 फेब्रुवारीला देशभरात चक्का जाम करण्याची घोषणा करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर शनिवारी 6 फेब्रुवारीला देशभरात दुपारी 12 ते 3 या वेळेत चक्का जाम करण्यात येणार आहे. 'भारतीय किसान युनियन'चे नेते बलबीर सिंग यांनी याबाबतची घोषणा केली आहे. यामुळे आता गाझीपुर बॉर्डरवरील सुरक्षा व्यवस्थेत अधिक वाढ करण्यात आलेली आहे.

नोव्हेंबरपासून दिल्लीच्या वेशीवर शेतकऱ्यांचे आंदोलन -दिल्ली आणि जवळपासच्या परिसरात इंटरनेट सेवा खंडीत करण्यात आल्याने, तसेच अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी विशेष घोषणा करण्यात आली नसल्याचे म्हणतही बलबीर सिंग यांनी नाराजी व्यक्त केली आहे. गेल्या नोव्हेंबर 2020पासून दिल्लीच्या वेशीवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. केंद्र सरकारने आणलेले तीन कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीला घेऊन हे आंदोलन सुरू आहे. 

तत्पूर्वी, शेतकरी संघटनांनी कृषी कायद्यांना विरोध दर्शवत महात्मा गांधी यांच्या पुन्यतिथी दिनी 30 जानेवारीला दिवसभर उपवास केला होता. तसेच 26 जानेवारीला दिल्ली येथे ट्रॅक्टर परेडदेखील काढली होती. मात्र, यावेळी काही लोकांनी दिल्लीच्या काही भागात मोठ्या प्रमाणावर धुडगूस घातला होता. 

11 वेळा चर्चा पण तोडगा नाही -सरकारने या तिन्ही कायद्यांच्या बाबतीत चर्चा करण्याची तयारी दाखवली. मात्र, कायदे रद्द करण्यास स्पष्टपणे नकार दिला आहे. आतापर्यंत 11 बैठकांची सत्रे झाली असून अद्यापही यावर तोडगा निघालेला नाही. कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी नवे कृषी कायदे एक ते दीड वर्षांसाठी स्थगित करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. मात्र, शेतकरी MSP ची हमी आणि कायदे परत घेण्यावर ठाम आहे.

केवळ एका फोन कॉलचे अंतर -दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही यासंदर्भात भाष्य केले आहे. सरकारने शेतकऱ्यांना दिलेला प्रस्ताव अद्यापही कायम असून, त्यांच्या आणि शेतकऱ्यांमध्ये केवळ एका फोन कॉलचेच अंतर असल्याचे मोदींनी म्हटले आहे. 

टॅग्स :Farmer strikeशेतकरी संपFarmerशेतकरीdelhiदिल्लीChakka jamचक्काजाम