शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

Farmers Protest: ६ फेब्रुवारीला 'चक्का जाम', जे जे रस्त्यात अडकणार त्यांना...; टिकैत यांची 'अनोखी' घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2021 17:55 IST

Farmers Protest: कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचा आक्रमक पवित्रा; ६ तारखेला ३ तास चक्का जाम

नवी दिल्ली: केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात गेल्या ७० दिवसांपासून शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. दिल्लीच्या सीमेवर हजारो शेतकरी आंदोलन करत आहेत. तिन्ही कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीवर शेतकरी ठाम आहेत. शेतकरी आणि सरकारमध्ये बैठकांच्या अनेक फेऱ्या झाल्यावरही या प्रश्नी तोडगा निघालेला नाही. त्यामुळे आता भारतीय किसान युनियननं चक्का जाम आंदोलनाची घोषणा केली आहे. ६ फेब्रुवारीला शेतकऱ्यांकडून चक्का जाम आंदोलन करण्यात येईल.शेतकरी आंदोलन कसं संपवावं लागेल? माजी पंतप्रधानांनी सांगितला मोठा मार्ग६ फेब्रुवारीला राष्ट्रीय, राज्य महामार्गांवर चक्का जाम करण्यात येणार आहे. दिल्लीसोबतच दिल्लीच्याबाहेर चक्का तीन तासांसाठी चक्का जाम केला जाईल, अशी माहिती भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी दिली. 'चक्का जाम आंदोलनावेळी वाहतूक कोंडीत अडकणाऱ्यांना पाणी आणि जेवण देण्यात येईल. सरकार आमच्यासोबत कशा प्रकारचं वर्तन करतंय याची माहितीदेखील आम्ही वाहतूक कोंडीत अडकलेल्यांना प्रवाशांना देऊ,' असं टिकैत यांनी सांगितलं.कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकऱ्यांनी २६ जानेवारीला ट्रॅक्टर मोर्चा काढला. त्यावेळी अनेक ठिकाणी आंदोलक आणि पोलीस आमनेसामने आले. दिल्लीच्या काही भागांमध्ये हिंसाचार झाला. दिल्ली पोलिसांनी शेतकऱ्यांना ताब्यात घेतलं. त्यांची अद्याप सुटका झालेली नाही. त्यांची सुटका करण्याची मागणी टिकैत यांनी केली. शेतकरी आंदोलन करत असलेल्या भागांमध्ये इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे याकडेदेखील त्यांनी लक्ष वेधलं. भारतीय किसान संघाचा पाठिंबा नाही.टीम इंडियाच्या बैठकीत शेतकरी आंदोलनावर झाली चर्चा - विराट कोहलीराष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित भारतीय किसान संघानं चक्का जाम आंदोलनाला पाठिंबा दिलेला नाही. 'दिल्लीच्या सीमावर्ती भागांत सुरू असलेलं आंदोलन पूर्णपणे राजकीय झालं आहे. हे आंदोलन राजकीय अजेंड्याचा भाग आहे. कॅनडा, ब्रिटिशमधील राजकीय नेते, काही सेलिब्रिटी आंदोलनाला पाठिंबा देत आहेत. त्यामुळे हे आंदोलन म्हणजे भारताविरोधात सुरू असलेला अजेंडा आहे. यामुळे देशाच्या शांततेला धोका निर्माण झाला आहे,' असं भारतीय किसान संघाचे राष्ट्रीय सचिव बद्री नारायण चौधरींनी सांगितलं.

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलनrakesh tikaitराकेश टिकैत