शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

'कृषी कायद्यांवर पुनर्विचार करा, शेतकऱ्यांच्या संयमाची परीक्षा घेऊ नका', शरद पवारांचा सरकारला सल्ला    

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2020 18:02 IST

sharad pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि  माजी कृषीमंत्री शरद पवार यांनी कृषी कायद्यांवर पुनर्विचार करण्याची मागणी सरकारकडे केली आहे.

ठळक मुद्देआंदोलनाच्या पहिल्या दिवसापासून हे तीनही कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीवर शेतकरी ठाम आहेत.

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात गेल्या काही दिवसांपासून दिल्ली सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. या कृषी कायद्यांविरोधात शेतकरी  ठाम आहेत, तर दुसरीकडे सरकारही माघार घेण्याच्या मन: स्थितीत नाही. त्यामुळे दिल्लीत मोठ्या हालचाली सुरू आहेत. दरम्यान, विरोधी पक्षाचे नेते  मोदी सरकारवर हल्लाबोल करण्याबरोबरच सल्लाही देत ​​आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि  माजी कृषीमंत्री शरद पवार यांनी कृषी कायद्यांवर पुनर्विचार करण्याची मागणी सरकारकडे केली आहे.

सरकारने कृषी कायद्यांवर फेरविचार करायला हवा, हे कायदे चर्चेविना पारित झाले, सर्वांनी सरकारला यावर चर्चा करण्यास सांगितले होते. मात्र, सरकारने विरोधकांकडे दुर्लक्ष करत संसदेत घाई करून कृषी कायदे मंजूर केले, असे शरद पवार म्हणाले. याचबरोबर, असे समजू नका की आता केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या मागणीकडे लक्ष देण्याच्या मूडमध्ये नाही. यासाठी हे आंदोलन सुरूच राहील. सध्या हे आंदोलन दिल्लीच्या सीमेपर्यंत मर्यादित आहे. योग्य वेळी निर्णय न घेतल्यास हे आंदोलन इतर ठिकाणी होईल, असे सांगत शरद पवार यांनी शेतकर्‍यांच्या संयमाची परीक्षा घेऊ नये, अशी विनंती सरकारला केली आहे. 

'कृषी कायदे अत्यंत विचारपूर्वक'"भारत सरकारने अत्यंत विचारपूर्वक कृषी कायदे केले आहेत. शेतकऱ्यांच्या जीवनात बदल घडवून आणण्यासाठी तयार केले आहेत. वर्षानुवर्षे शेतकर्‍यांवर होत असलेले अन्याय दूर करण्यासाठी तयार केले आहेत. तरीही सरकार शेतकरी संघटनांशी चर्चा करून कायद्यांमध्ये सुधारणा करण्यास तयार आहे. शेतकऱ्यांनी आंदोलन मागे द्यावे," असे केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी म्हटले आहे.

आता शेतकऱ्यांचा काय प्लॅन?आंदोलनाच्या पहिल्या दिवसापासून हे तीनही कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीवर शेतकरी ठाम आहेत. आता आंदोलन मोठ्या पातळीवर नेण्याचा शेतकरी निर्धार करीत आहेत. आता 12 डिसेंबरपासून शेतकरी देशभर टोल नाके फ्री करण्याची तयारी करत आहेत. तर 14 डिसेंबर रोजी देशभरातील भाजपा नेत्यांना घेराव करून जिल्हा मुख्यालयात निदर्शने करण्याची योजना आहे. एवढेच नव्हे तर सरकारवर दबाव वाढवण्यासाठी शेतकरी संघटनांनी 12 डिसेंबरपासून दिल्लीचा वेढा वाढवण्याचा इशाराही दिला आहे. 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारFarmer strikeशेतकरी संपdelhiदिल्लीFarmerशेतकरी