शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

Farmers Protest : शेतकरी आंदोलन : दररोज ५०० कोटींचे नुकसान अन् १७ लाख कर्मचाऱ्यांना बसेल फटका! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2024 09:40 IST

Farmers Protest : या आंदोलनामुळे दिल्ली किंवा दिल्लीतून एनसीआरमध्ये कामासाठी जाणाऱ्या लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. 

Farmers Protest (Marathi News) नवी दिल्ली : शेतकरी आंदोलन  (Farmers Protest) जोरात सुरू आहे. 'दिल्ली चलो'चा (Dilli Chalo) नारा देत हरयाणातील अंबाला येथील शंभू बॉर्डरवर शेतकरी ठाण मांडून बसले आहेत. दुसरीकडे, दिल्लीच्या सीमा सील करण्यात आल्या आहेत. या आंदोलनामुळे दिल्ली किंवा दिल्लीतून एनसीआरमध्ये कामासाठी जाणाऱ्या लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. 

दरम्यान, शेतकरी आंदोलन दीर्घकाळ सुरू राहिल्यास दररोज ५०० कोटी रुपयांचे नुकसान होईल, असा अंदाज पीएचडी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (PHDCCI) या उद्योग संघटनेने व्यक्त केला आहे. तसेच, जवळपास ७० लाख कर्मचाऱ्यांनाही याचा फटका बसणार असल्याचेही पीएचडीसीसीआयच्या अहवालात म्हटले आहे. 

पीएचडीसीसीआयच्या मते, शेतकरी आंदोलनाच्या दीर्घ कालावधीमुळे उत्तर भारतातील राज्यांमधील व्यवसायाचे 'गंभीर नुकसान' होऊ शकते. शेतकरी आंदोलनामुळे रोजगारावरही मोठा परिणाम होणार आहे. अंदाजानुसार, शेतकरी आंदोलनामुळे दररोज ५०० कोटी रुपयांपेक्षा जास्त आर्थिक नुकसान होणार आहे. 

पीएचडीसीसीआयचे प्रमुख संजीव अग्रवाल म्हणाले की, शेतकऱ्यांचे आंदोलन दीर्घकाळ सुरू राहिल्यास दररोज ५०० कोटी रुपयांचे नुकसान होईल. याचा परिणाम उत्तर भारतीय राज्यांच्या, विशेषतः हरयाणा, पंजाब आणि दिल्लीच्या चौथ्या तिमाहीतील जीएसडीपीवर होईल. देशातील सर्व लोकांच्या कल्याणासाठी सरकार आणि शेतकरी या दोघांच्या संमतीने लवकरात लवकर तोडगा निघेल, अशी उद्योग संस्थेला आशा आहे. 

याचबरोबर, शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा पंजाब, दिल्ली, हरयाणा, उत्तर प्रदेश आणि राजस्थानमधील काही भागातील एमएसएमईवर गंभीर परिणाम होत आहे. उत्पादनासाठी आणि ग्राहकांच्या मागणीची पूर्तता करण्यासाठी, अशा युनिट्समधील कच्चा माल मोठ्या प्रमाणावर इतर राज्यांमध्ये जातो, असे संजीव अग्रवाल यांनी सांगितले.

काय आहेत आंदोलक शेतकऱ्यांच्या मागण्या?- किमान आधारभूत किंमत (MSP) साठी कायदा करणे. ही शेतकऱ्यांची सर्वात महत्त्वाची मागणी आहे. - स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करणे. - आंदोलनात सहभागी शेतकऱ्यांचे कृषी कर्ज माफ करणे. - कृषी वस्तू, दुग्धजन्य पदार्थ, फळे, भाजीपाला आणि मांसावरील आयात शुल्क कमी करण्यासाठी भत्ता वाढवणे.- ५८ वर्षांवरील शेतकरी आणि शेतमजुरांना पेन्शन योजना लागू करून दरमहा १०,००० रुपये पेन्शन मिळावी. - भूसंपादन कायदा, २०१३ याच पद्धतीने लागू करण्यात यावा आणि केंद्र सरकारने भूसंपादनाबाबत राज्यांना दिलेल्या सूचना रद्द करण्यात याव्यात. - लखीमपूर खेरी हिंसाचारातील पीडितांना न्याय मिळावा. - प्रधानमंत्री फसल विमा योजनेत सुधारणा करण्यासाठी विम्याचा हप्ता सरकारने स्वतः भरणे. - नुकसानीचे मूल्यांकन करताना शेत एकराचा एक घटक म्हणून विचार करून नुकसानीचे मूल्यांकन करणे. 

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलनFarmerशेतकरी