शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी सभा अकोल्यात? नेत्यांचा अंतर्गत वाद सुरू, १८ रोजी रेल्वे रोको; टिकैत राज्यात येणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2021 05:49 IST

Farmers meeting in Akola? : टिकैत यांच्या हरियाणा आणि उत्तर प्रदेशात लाखो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत सभा होत आहे.

- विकास झाडे

नवी दिल्ली : २० फेब्रुवारीला यवतमाळात ठरलेली शेतकऱ्यांची महापंचायत आता अकोल्यात होऊ शकते. यामुळे शेतकरी नेत्यांमध्येच अंतर्गत वाद सुरू आहेत.भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत हे २० फेब्रुवारी रोजी यवतमाळात येऊन कृषी कायदा किती घातक आहेत याबाबत मार्गदर्शन करणार होते. टिकैत यांच्या हरियाणा आणि उत्तर प्रदेशात लाखो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत सभा होत आहे. महाराष्ट्रातही तशीच गर्दी व्हावी म्हणून महाराष्ट्रात संयुक्त किसान मोर्चाने यवतमाळसाठी जय्यत तयारी सुरू केली आहे. त्यासाठी संदीप गिड्डे पाटील, प्रतिभा शिंदे, डॉ. अशोक ढवळे, शंकर दरेकर, विवेकानंद महात्मे आदी विविध शेतकरी संघटनेचे पदाधिकारी जोरात कामाला लागले आहेत. परंतु ऐन वेळेवर भारतीय किसान युनियनचे महासचिव युधवीर सिंग यांनी ही सभा यवतमाळात न घेता अकोला इथे घ्या, असे फर्मान सोडले आहे. त्यामुळे शेतकरी कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ उडाला आहे. तरीही ही सभा यवतमाळातच व्हावी, असा आग्रह महाराष्ट्र संयुक्त किसान मोर्चाचा आहे. युधवीर सिंग यांनी ऐकले नाही तर अकोला येथील सभेला गर्दी होणार नाही, असे एका कार्यकर्त्याने सांगितले.

उच्चस्तरीय चौकशी व्हावी- २६ जानेवारी रोजी झालेल्या हिंसाचारात अनेक शेतकऱ्यांना गोवण्यात आले आहे. - पोलिसांनी त्यांना नोटीस पाठवली आहे. परंतु शेतकऱ्यांवर नोंदविण्यात आलेल्या गुन्ह्याची चौकशी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांकडून करण्याची मागणी शेतकरी नेत्यांनी केली. - अद्यापही १२५ शेतकरी नेते तुरुंगात डांबले आहेत. २७ शेतकरी बेपत्ता आहेत. उद्या आंदोलक शेतकरी सीमांवर छोटूराम जयंतीचा कार्यक्रम साजरा करतील, तर १८ फेब्रुवारीला दुपारी १२ ते ४ पर्यंत रेल्वे रोको केले जाईल.

टॅग्स :rakesh tikaitराकेश टिकैतFarmers Protestशेतकरी आंदोलन