शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांचा एल्गार! २९ नोव्हेंबरला १ हजार ट्रॅक्टर्स घेऊन संसदेवर कूच करणार, शेतकऱ्यांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2021 20:02 IST

शेतकरी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी आता पुन्हा एकदा राजधानी दिल्लीतील संसद भवनाच्या दिशेनं कूच करण्याचा निर्णय घेतला आहे.

शेतकरी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी आता पुन्हा एकदा राजधानी दिल्लीतील संसद भवनाच्या दिशेनं कूच करण्याचा निर्णय घेतला आहे. २९ नोव्हेंबर रोजी शेतकरी आंदोलक गाजीपूर आणि टिकरी सीमेवरुन प्रत्येकी ५०० ट्रक्टर्ससह संसद भवनाच्या दिशेनं रवाना होतील. संयुक्त किसान मोर्चाच्या (SKM) ९ सदस्यीय समितीच्या बैठकीत याबाबतचा निर्णय झाला आहे. 

सोनीपतच्या कुंडली सीमेजवळ संयुक्त किसान मोर्चाची बैठक झाली. या बैठकीत संसद भवनावर धडक मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. येत्या २६ नोव्हेंबरपासून आंदोलकांच्या संख्येत वाढ करण्यात येईल आणि २९ नोव्हेंबर रोजी टिकरी व गाजीपूर सीमेवरुन आंदोलनाला सुरुवात होईल. दोन्ही सीमांवरुन प्रत्येकी ५०० असे एकूण १००० ट्रॅक्टर्स संसद भवानाच्या दिशेनं कूच करतील. याशिवाय पोलिसांकडून ज्या ठिकाणी अडवण्यात येईल त्याच ठिकाणी ठाण मांडून आंदोलन सुरू ठेवलं जाईल, असा निर्णय शेतकऱ्यांनी बैठकीत घेतला आहे. 

बैठकीतून नाराज होऊन बाहेर पडले गुरनाम सिंग चढूनीसंयुक्त किसान मोर्चाच्या बैठकीबाबत माहिती देताना शेतकरी नेते जगजीत सिंह डल्लेवाल यांनी महत्त्वाची माहिती दिली. २९ नोव्हेंबर रोजी टिकरी आणि गाजीपूर सीमेवरुन शेतकरी ट्रॅक्टर्ससह संसद भवनाच्या दिशेनं निघतील. शेतकऱ्यांना ज्याठिकाणी पोलिसांकडून अडवलं जाईल त्याच ठिकाणी रस्त्यावरच ठाण मांडून आंदोलन सुरु ठेवलं जाईल असं ठरविण्यात आलं. याच बैठकीत शेतकरी नेते गुरनाम सिंग चढूनी मात्र नाराज होऊन बाहेर पडले. यावेळी त्यांनी माध्यमांना कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. 

टॅग्स :Farmer strikeशेतकरी संपFarmers Protestशेतकरी आंदोलनdelhiदिल्ली