शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

तेलंगणात शेतकऱ्यांचे कर्ज होणार माफ; मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचे निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2023 15:30 IST

मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी तेलंगणातील शेतकऱ्यांचे कल्याण आणि कृषी विकास हे राज्य सरकारचे मुख्य उद्दिष्ट असल्याचा पुनरुच्चार केला.

हैदराबाद : शेतकरी कर्जमाफी कार्यक्रम ३ ऑगस्टपासून पुन्हा सुरू करण्याचा निर्णय तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी घेतला आहे. मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी तेलंगणातील शेतकऱ्यांचे कल्याण आणि कृषी विकास हे राज्य सरकारचे मुख्य उद्दिष्ट असल्याचा पुनरुच्चार केला.

अनेक आव्हानांचा सामना करूनही सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी कटिबद्ध असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मुख्यमंत्री केसीआर म्हणाले की, केंद्राच्या नोटाबंदीच्या निर्णयामुळे आलेली आर्थिक मंदी, कोरोना महामारीचा राज्याच्या अर्थव्यवस्थेवर झालेला परिणाम, एफआरबीएम निधी न जारी करून तेलंगणा राज्याप्रति केंद्राने दाखविलेली सूडबुद्धीची वृत्ती, यामुळे राज्याची वित्तीय तूट वाढली. परिणामी, शेतकरी कर्जमाफी योजनेला विलंब झाला.  

राज्याची आर्थिक परिस्थिती सदृढ असताना मुख्यमंत्री केसीआर यांनी शेतकरी कर्जमाफी योजना पुन्हा सुरू करण्यासाठी उचलल्या जाणाऱ्या पावलांवर प्रगती भवन येथे उच्चस्तरीय आढावा बैठक घेतली. या आढावा बैठकीत राज्याचे अर्थमंत्री टी. हरीश राव, मुख्यमंत्र्यांचे मुख्य सल्लागार सोमेश कुमार, अर्थ विभागाचे विशेष मुख्य सचिव रामकृष्ण राव, एचएमडीएचे प्रधान सचिव अरविंद कुमार आणि कृषी सचिव रघुनंदन राव यांची उपस्थिती होती.

आणखी १९,००० कोटी रुपयांची आवश्यकता मुख्यमंत्री केसीआर म्हणाले की, त्यांनी दिलेल्या वचनानुसार सरकार शेतकरी कर्जमाफी योजना राबवत आहे. आधीच माफ केलेल्या कर्जानंतर, प्रलंबित शेती कर्ज माफ करण्यासाठी आणखी १९,००० कोटी रुपयांची आवश्यकता आहे, असेही ते म्हणाले. शेतकरी कर्जमाफीचा कार्यक्रम सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत पूर्ण करण्याच्या स्पष्ट सूचना मुख्यमंत्री केसीआर यांनी दिल्या आहेत.

टॅग्स :K Chandrashekar Raoके चंद्रशेखर रावTelanganaतेलंगणाFarmerशेतकरी