शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी आज करणार महामार्ग जाम आंदोलन! पंजाबहून हजारोंची दिल्लीकडे कूच

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2020 07:22 IST

Farmers Protest : शेतकरी आंदोलनाच्या १६ व्या दिवशीही कुठलाही तोडगा निघू शकला नाही. तिन्ही कृषी कायदे मागे घ्यावेत यासाठी शेतकऱ्यांनी सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावले आहे.

- विकास झाडे    नवी दिल्ली - शेतकरी आंदोलनाच्या १६ व्या दिवशीही कुठलाही तोडगा निघू शकला नाही. तिन्ही कृषी कायदे मागे घ्यावेत यासाठी शेतकऱ्यांनी सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावले आहे. तर उद्या शनिवारी देशभरातील टोल नाके मुक्त करण्याचा आणि दिल्ली-जयपूर व दिल्ली-आगरा महामार्ग अडविण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला आहे. त्यासाठी पंजाबच्या विविध भागांतून हजारो शेतकरी दिल्लीकडे निघाले आहेत. तसेच दिल्ली, पंजाब, हरयाणा, उत्तर प्रदेश, राजस्थानसह सर्व राज्यांत टोल नाके व रस्ते बंद करण्याचे त्यांनी ठरविले आहे. काही ठिकाणी रेल रोकोही केला जाईल, असे कळते.आतापर्यंत सरकारकडून आलेले प्रस्ताव शेतकऱ्यांनी फेटाळले आहेत. कोरोना असो वा कडाक्याची थंडी, कृषी कायदे मागे घेतल्याशिवाय जराही हटणार नाही, असा शेतकऱ्यांनी आज पुन्हा संकल्प केला आहे. भारतीय शेतकरी संघटनेने (भानु) सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करीत सरकारने लादलेले तिन्ही  कायदे रद्द करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी सामान्य लोकांचा विचार करून आंदोलन मागे घ्या. चर्चेने सगळ्याच गोष्टी सुटतील, अशी विनंती पुन्हा केली. परंतु शेतकऱ्यांनी या प्रस्तावाबाबत अधिकृत काहीही कळविले नसल्याचे म्हटले आहे. मेधा पाटकर यांच्या नेतृत्वात पलवल येथून शेतकरी येत असताना बदरपूर सीमेवर कडक सुरक्षा यंत्रणा ठेवण्यात आली. नोएडा येथे दलित प्रेरणास्थळावरही अनेक शेतकऱ्यांनी धरणे दिले आहे. आज येथून तिन्ही कायद्याची अंत्ययात्रा काढण्यात आली आणि प्रतीकात्मक दहन केले. शनिवारी यानिमित्ताने ११ शेतकरी मुंडण करून सरकारचा निषेध करणार आहेत. शुक्रवारी भारतीय शेतकरी संघटनेचे प्रवक्ते राकेश टिकेत यांनी उत्तर प्रदेश प्रवेशद्वारावर केलेल्या भाषणात शेतकऱ्यांना सांगितले की,  आंदोलनात काही असामाजिक तत्त्व येऊ शकतात. त्यांच्यामुळे आंदोलनाला गालबोट लागू शकते. त्यामुळे सावध राहण्याची गरज आहे. हे आंदोलन आता बराच काळ चालणार आहे. शेतकऱ्यांच्या संयमाची परीक्षा घेऊ नकाशरद पवार यांचा सल्लाशेतीविषयक कायद्यांविषयी केंद्र सरकारने पुनर्विचार करावा. केंद्राने शेतकऱ्यांच्या संयमाची परीक्षा घेऊ नये, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला. तूर्त हे आंदोलन दिल्लीपुरता मर्यादित आहे. योग्य वेळी निर्णय घेतल्यास आंदोलन इतरत्र पोहोचेल, असेही ते म्हणाले.धर्मेंद्रने वेधले लक्ष! चित्रपट अभिनेता धर्मेंद्र यांनीही ट्विट करीत शेतकऱ्यांच्या यातनांमुळे दु:ख होत असल्याचे सांगितले. सरकारने तातडीने यावर मार्ग काढावा, असे सुचविले....तर राजीनामा देणार! हरयाणाचे उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांनी शेतकऱ्यांच्या पिकांना आधारभूत मूल्य मिळायला पाहिजे. मी ते मिळवून देईल. त्यात अपयश आले तर पदाचा राजीनामा देईन, असे जाहीर केले.

टॅग्स :Farmerशेतकरीdelhiदिल्ली