दापोरा येथे शेतकर्यांची कसरत
By admin | Updated: April 13, 2016 00:20 IST
दापोरा : गिरणा धरणाचे पाणी दापोरा बंधार्यापर्यंत न आल्यामुळे यावर्षी दापोरा येथील केळीच्या बागा धोक्यात आल्या आहेत. त्यामुळे अनेक शेतकरी हे नवीन कूपनलिका, विहिरी, जुन्या विहिरींचे खोलीकरण यासारख्या उपाययोजना राबवून केळी वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र त्यानंतरदेखील अनेक केळी बागा सुकत आहेत.
दापोरा येथे शेतकर्यांची कसरत
दापोरा : गिरणा धरणाचे पाणी दापोरा बंधार्यापर्यंत न आल्यामुळे यावर्षी दापोरा येथील केळीच्या बागा धोक्यात आल्या आहेत. त्यामुळे अनेक शेतकरी हे नवीन कूपनलिका, विहिरी, जुन्या विहिरींचे खोलीकरण यासारख्या उपाययोजना राबवून केळी वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र त्यानंतरदेखील अनेक केळी बागा सुकत आहेत.बीएचआरमधील ठेवीची रक्कम मिळावीजळगाव : भाईचंद हिराचंद रायसोनी (बीएचआर) पतसंस्थेत सेवानिवृत्तीनंतर मिळणारी सर्व रक्कम आपण मुदत ठेवीच्या स्वरुपात ठेवली आहे. मात्र मुदत संपल्यानंतरदेखील ठेवीची रक्कम मिळत नसल्याबाबत तक्रार अर्ज टाकळी प्र.चा.येथील सुभाष मोरे यांनी लोकशाहीदिनात दिला आहे.एमआयडीसीला मिळाले प्रादेशिक अधिकारीजळगाव: एमआयडीसीचे प्रादेशिक कार्यालय हे धुळे येथे आहे. गेल्या वर्षभरापासून प्रादेशिक अधिकार्याचे पद रिक्त होते. त्यामुळे औद्योगिक विकासाची कामे ठप्प झाली होती. गेल्या आठवड्यात नाशिक येथील जितेंद्र काकुस्ते यांनी पदभार स्विकारला आहे. जळगाव भेटीत त्यांनी उद्योजकांचे प्रश्न आस्थेवाईकपणे जाणून घेतल्याचे सी.ए.आर.डी.जैन यांनी कळविले आहे.दशनाम गोसावी समाजाचा वधूवर मेळावाजळगाव : अ.भा.दशनाम गोसावी समाजाचा वधू-वर मेळावा गुरुवार १४ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता ओम चैतन्य गंगनगिरी मंगल कार्यालय, विश्रांतवाडी पुणे येथे होत आहे. जळगाव व धुळ्यातील समाजबांधवांनी सहभागी व्हावे असे आवाहन प्रशांत गोसावी यांनी केले आहे.