शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

शेतकऱ्यांचा आज ‘भारत बंद’! दूध, फळे, भाजीपाल्याचा पुरवठा होणार ठप्प

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2020 07:29 IST

Farmers Protest : जाहीर केल्याप्रमाणे शेतकऱ्यांनी मंगळवारी भारत बंद पुकारला आहे. परंतु शेतकऱ्यांच्या संघटनांनी आपल्या व्यासपीठावर कोणत्याही राजकीय नेत्यांना येऊ द्यायचे नाही, असा निर्णय घेतला आहे.

- विकास झाडे नवी दिल्ली : जाहीर केल्याप्रमाणे शेतकऱ्यांनी मंगळवारी भारत बंद पुकारला आहे. परंतु शेतकऱ्यांच्या संघटनांनी आपल्या व्यासपीठावर कोणत्याही राजकीय नेत्यांना येऊ द्यायचे नाही, असा निर्णय घेतला आहे. शेतकरी नेते बलबीरसिंग राजेवाल आणि राकेश टिकेत यांनी सांगितले की, मंगळवारी दुपारी तीन वाजेपर्यंत भारत बंद करण्यात येणार आहे. परंतु आपत्कालीन सेवांना परवानगी देण्यात येईल. केंद्र सरकार कायदे मागे घेईपर्यंत आमचे आंदोलन सुरूच राहील, याचा पुनरुच्चार संघटनेच्या नेत्यांनी केला. दरम्यान, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सिंघू सीमेवरील गुरू तेग बहादुर मेमोरियल येथे जाऊन आंदोलनात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांची भेट घेतली. तेथील व्यवस्थेचीही पाहणी केली. इथे मी मुख्यमंत्री म्हणून नाही तर एक सेवक म्हणून येथे आलो असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी केजरीवाल यांच्यासोबत उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया, सत्येंद्र जैन, राजेंद्र पाल गौतम, इमरान हुसेन हे मंत्रीसुद्धा उपस्थित होते.शेतकरी आंदोलनाला तृणमूल काँग्रेसचा पाठिंबा असला तरी बंदमध्ये सहभागी होणार नाही. केरळमधील सत्ताधारी डावी आघाडी व काँग्रेसचा बंदला पाठिंबा आहे परंतु तिथे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका उद्या असल्याने राज्यात बंद पाळला जाणार नाही. मात्र तिन्ही कृषी कायद्यांविरोधात सरकार सुप्रीम कोर्टात जाणार आहे. 

पुरस्कार वापसी! आंदोलनाला समर्थन देण्यासाठी पंजाबमधील खेळाडू पुढे आले आहेत. जवळपास ३० खेळाडूंनी पुरस्कार परत करण्यासाठी राष्ट्रपती भवनाची वाट धरली. परंतु, दिल्ली पोलिसांकडून त्यांना रस्त्यातच अडवण्यात आले. पंजाब आणि इतर ठिकाणच्या काही खेळाडूंनी आपले पुरस्कार सरकारला परत देणार असल्याचे कुस्तीपटू करतार सिंह यांनी सांगितले.

किमान हमीभाव द्या! शेतकऱ्यांचे उत्पन्न  वाढवण्यासाठी किमान हमीभावासंबंधीचा कायदा आवश्यक असल्याचे मत दिल्लीचे कृषिमंत्री गोपाल राय यांनी सोमवारी व्यक्त केले. शेतकऱ्यांच्या विकासासाठीच्या उपाययोजनांवर चर्चा करण्यासाठी केंद्र सरकारने उच्चस्तरीय बैठक बोलाविली. यात दिल्ली, पंजाब तसेच हरयाणाचे कृषिमंत्री या बैठकीत उपस्थित होते.  

फळे-भाज्या महागल्या! दिल्ली तसेच राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात ८० टक्के शेतमाल दिल्लीतील आझादपूर कृषी उत्पन्न बाजार समितीतून येतो. आंदोलनामुळे फळ, भाज्यांची दरदिवशीची आवक सरासरी ५ हजार ५०० मेट्रिक टनांनी घटली आहे. 

टॅग्स :Farmerशेतकरी