चंडीगड : हरयाणाच्या सुरक्षा दलांनी शंभू व खनौरी सीमेवरून आंदोलक शेतकऱ्यांना हटवल्यानंतर अनेक शेतकऱ्यांची धरपकड सुरू आहे. गुरुवारी रस्त्यावरील सिमेंटचे अडथळे काढण्यास सुरुवात केली. शेतकऱ्यांना दिल्लीकडे जाण्यास मज्जाव करण्यासाठी हे अडथळे ठेवण्यात आले होते.
या सीमेवरील अडथळे काढण्यासाठी जेसीबीची मदत घेतली जात आहे. सुमारे एक वर्षापासून हा मार्ग बंद होता. आता शंभू सीमेवर उभारण्यात आलेले तात्पुरते बांधकाम व इतर अडथळे काढले जात आहे.
कारवाईच्या निषेधार्थ धरणे आंदोलनसंयुक्त किसान मोर्चा आणि किसान मजदूर मोर्चाने पंजाब पोलिसांनी आंदोलकांवर केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ धरणे आंदोलनाची घोषणा केली आहे.
काँग्रेसचा आरोपभाजप व आपने शेतकऱ्यांना हटवून विश्वासघात केला असल्याचा आरोप काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केला. देशातील ६२ कोटी शेतकरी या पक्षांना कधीही माफ करणार नाहीत, असे ते म्हणाले.
सरकार-शेतकरी चर्चेची सातवी फेरीबुधवारी चर्चेच्या सातव्या फेरीत सरकारकडून च्या वतीने ग्राहक मंत्री प्रल्हाद जोशी आणि वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनीही प्रतिनिधित्व केले.