पाऊस नसल्याने शेतकरी धास्तावले
By admin | Updated: July 10, 2015 21:26 IST
गंगापूर : लातूर तालुक्यातील गंगापूर परिसरात अद्यापही पाऊस झाला नसल्याने पेरण्या रखडल्या आहेत़ परिणामी, पशूधनाच्या चारा आणि पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे़ त्यामुळे शेतकरी धास्तावले आहेत़
पाऊस नसल्याने शेतकरी धास्तावले
गंगापूर : लातूर तालुक्यातील गंगापूर परिसरात अद्यापही पाऊस झाला नसल्याने पेरण्या रखडल्या आहेत़ परिणामी, पशूधनाच्या चारा आणि पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे़ त्यामुळे शेतकरी धास्तावले आहेत़या भागात गतवर्षी कमी पाऊस झाल्याने रबीच्या पेरण्याच झाल्या नाहीत़ यावर्षीही अद्याप पाऊस झाला नाही़ परिणामी, या भागातील विहिरी, कुपनलिका कोरड्या पडल्या आहेत़ पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे़ त्यामुळे नागरिकांची भटकंती सुरु आहे़ सध्या कडब्याला सोन्याचे भाव आले असून त्यामुळे शेतकर्यांना पशूधन सांभाळणे कठीण झाले आहे़