शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

"शेतकऱ्यांचे आंदोलन लवकरच संपेल"; कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांना विश्वास

By देवेश फडके | Updated: January 25, 2021 19:11 IST

केंद्रीय कृषी कायद्याविरोधात डिसेंबर महिन्यापासून दिल्लीत हजारो शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. यासंदर्भात केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी महत्त्वाचे विधान केले असून, शेतकऱ्यांचे आंदोलन लवकरच संपेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. 

ठळक मुद्देशेतकऱ्यांचे आंदोलन लवकरच संपेल - नरेंद्र सिंह तोमरट्रॅक्टर रॅलीसाठी अन्य कोणताही दिवस निवडता आला असता - नरेंद्र सिंह तोमरशेतकरी आंदोलन संपुष्टात येण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न - नरेंद्र सिंह तोमर

नवी दिल्ली : केंद्रीय कृषी कायद्याविरोधात डिसेंबर महिन्यापासून दिल्लीत हजारो शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. यासंदर्भात केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी महत्त्वाचे विधान केले असून, शेतकऱ्यांचे आंदोलन लवकरच संपेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. 

केंद्रीय कृषी कायद्याला विरोध म्हणून ट्रॅक्टर रॅली काढण्यावर शेतकरी ठाम आहेत. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने ट्रॅक्टर रॅली काढण्यात येणार आहे. केंद्र सरकारने यासंदर्भात आक्षेप नोंदवत सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावले होते. मात्र, हा विषय दिल्ली पोलिसांच्या अखत्यारित येत असून, या प्रकरणी हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला होता. नरेंद्र सिंह तोमर यांनी यासंदर्भात निराशा व्यक्त केली आहे. 

ट्रॅक्टर रॅलीसाठी प्रजासत्ताक दिनच का? 

ट्रॅक्टर रॅलीसाठी शेतकरी अन्य कोणताही दिवस निवडू शकत होते. मात्र, त्यांनी निश्चयच केला असेल, तर कोण काय करू शकतो, असा प्रश्न नरेंद्र सिंह तोमर यांनी उपस्थित केला आहे. कोणत्याही दुर्घटनेशिवाय शांततापूर्ण पद्धतीने रॅलीचे आयोजन करणे शेतकऱ्यांसह पोलीस प्रशासनासाठी जिकिरीचे ठरेल, असे मत त्यांनी मांडले. 

सर्वोच्च न्यायालयाकडे वेळ मागितला होता

शेतकऱ्यांचे आंदोलन संपुष्टात यावे, यासाठी केंद्र सरकारकडून शक्य तेवढे सर्व प्रयत्न केले जात आहेत. आतापर्यंत शेतकरी नेत्यांशी चर्चेच्या ११ फेऱ्या झाल्या. मात्र, सर्व बैठका निष्फळ ठरल्या. अखेरीस कृषी कायदे पुढील दीड वर्षापर्यंत स्थगित करण्याचा प्रस्ताव शेतकऱ्यांसमोर ठेवला आहे. सर्वोच्च न्यायालयाने कायद्याला स्थगिती दिली, तेव्हा आम्ही न्यायालयाकडे वेळ मागितला होता. जेणेकरून शेतकऱ्यांशी चर्चेच्या माध्यमातून हा प्रश्न सोडवता येऊ शकेल, असेही नरेंद्र सिंह तोमर यांनी सांगितले. 

शेतकरी हितासाठी कृषी कायदे

केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी कटिबद्ध आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट व्हावे, यासाठी गेल्या सहा वर्षात अनेक योजना, कार्यक्रम, धोरण यांमार्फत प्रयत्न करण्यात आले. शेतकऱ्यांच्या पीकाला, उत्पादनांना योग्य बाजारभाव मिळावा,  यासाठी नवीन कृषी कायद्यात तरतुदी करण्यात आल्या आहेत. कायद्यात आवश्यक तेवढेच बदल करण्यात आले आहेत. यामागे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उद्देश स्वच्छ आहे, असे तोमर यांनी यावेळी नमूद केले. 

मुंबईत शरद पवारांचे टीकास्त्र

कृषी कायद्यांविरोधात पंजाब, हरयाणातील शेतकरी आंदोलन करत आहेत. थंडी वाऱ्याची तमा न बाळगता शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. या शेतकऱ्यांची पंतप्रधान मोदींनी साधी चौकशी तरी केली का, असा प्रश्न राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आणि माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवारांनी विचारला. कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्लीच्या वेशीवर थंडी वाऱ्यात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी किसान सभेकडून नाशिक ते मुंबई असा मोर्चा काढण्यात आला. यावेळी ते बोलत होते. आंदोलक शेतकरी पंजाबचे असल्याचे म्हणतात. पंजाब काय पाकिस्तानात येते का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. देशाला स्वयंपूर्ण करण्यात पंजाबचे योगदान मोठे आहे. स्वातंत्र्याच्या आंदोलनात पंजाबने मोठी किंमत मोजली आहे. जालियनवाला बागेत रक्त सांडले आहे. फाळणीवेळी पंजाबने सर्वाधिक घाव सोसले आहेत, याची आठवण पवारांनी करून दिली.

 

टॅग्स :Farmerशेतकरीagitationआंदोलनdelhiदिल्लीPoliticsराजकारण