शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

Kisan Kranti Padyatra: 'राजा'विरोधात बळीराजाचा एल्गार, दिल्लीच्या वेशीवर पोलीस-शेतकरी भिडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2018 11:37 IST

कर्जमाफी, उसाला योग्य भाव यासह  दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या विविध मागण्यांसाठी हजारो शेतकऱ्यांनी राजधानी दिल्लीच्या सीमेवर धडक दिली आहे.

नवी दिल्ली - कर्जमाफी, उसाला योग्य भाव यासह  दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या विविध मागण्यांसाठी हजारो शेतकऱ्यांनी राजधानी दिल्लीच्या सीमेवर धडक दिली आहे. दरम्यान, या शेतकऱ्यांना राजधानीत प्रवेश करण्यापासून रोखण्यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त केला आहे. तसेच आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्यांचा आणि पाण्य़ाच्या फवाऱ्यांचा वापर करण्यात येत आहे. तसेच दिल्लीच्या पूर्व भागामध्ये जमावबंदी लागू करण्यात आली आहे. 

 

दरम्यान, जर दिल्लीतील सरकारला आमच्या समस्या ऐकवायच्या नाहीत, तर मग कुणाला ऐकवायच्या. आमचे प्रश्न मांडण्यासाठी आम्ही पाकिस्तान किंवा बांगलादेशमध्ये जायचं का? असा सवाल शेतकरी नेत्यांनी केला आहे. 

भारतीय किसान युनियनच्या झेंड्याखाली किसान क्रांती पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. ही पदयात्रा आज सकाळी राजधानी नवी दिल्लीच्या उंबरठ्यावर पोहोचली. मात्र या आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना राजधानीत प्रवेश करण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. शेतकऱ्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त केला असून, राजधानीत प्रवेश करणाऱ्या प्रत्येक वाहनाची कसून तपासणी केली जात आहे. त्यामुळे सीमेवरील रस्त्यांवर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.

आंदोलनकर्त्यां शेतकऱ्यांच्या मागण्या - 60 वर्षांवरील शेतकऱ्यांना निवृत्तीवेतन द्यावे- पंतप्रधान पीक विमा योजनेत बदल करण्यात यावा- ऊस उत्पादक शेतकऱ्यांना लवकर देय रक्कम द्यावी- शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात यावी- सिंचनासाठी मोफत वीजपुरवठा करण्यात यावा- किसान क्रेडिट कार्डवर व्याजमुक्त कर्ज मिळावे- भटक्या जनावरांपासून शेतीचे रक्षण करण्यासाठी व्यवस्था करावी- सर्व पिकांची पूर्णपणे खरेदी व्हावी- स्वामिनाथन समितीचा अहवाल स्वीकारण्यात यावा- उसाची देय रक्कम मिळण्यास उशीर झाल्यास त्यावर व्याज मिळावे 

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीGovernmentसरकारNew Delhiनवी दिल्ली