शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी आंदोलनाला लवकरच पूर्णविराम मिळेल- नरेंद्र सिंह तोमर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2021 07:13 IST

शेतकऱ्यांकडून येणाऱ्या प्रस्तावाची आम्ही वाट पाहत आहोत

- विकास झाडेनवी दिल्ली : आंदोलनात सहभागी झालेल्या प्रत्येक शेतकऱ्याचा आम्ही सन्मान करतो. परंतु तोडगा काढायचा असेल, तर तो सीमेवर निघणार नाही, टेबलवरच निघू शकतो. आम्ही शेतकऱ्यांकडून येणाऱ्या प्रस्तावाची वाट पाहत आहोत, अशी माहिती केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी दिली.भाजपचे थिंक टॅंक खा. विनय सहस्त्रबुद्धे यांच्या निवासस्थानी मोजक्या पत्रकारांसमोर नरेंद्र सिंग तोमर यांनी कृषी कायदे आणि आंदोलनाबाबत सरकारची भूमिका स्पष्ट केली. तोमर म्हणाले, मोदी सरकारची भूमिका सतत शेतकऱ्यांच्या कल्याणाची आणि न्याय देण्याची आहे. शेतकरी संघटनेच्या नेत्यांसोबत आम्ही ११ बैठका घेतल्या. तासन‌्तास चाललेल्या या बैठकांमध्ये शेतकऱ्यांच्या हिताचीच चर्चा झाली. शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घेता, शेवटच्या बैठकीमध्ये आम्ही तिन्ही कृषी कायदे दीड वर्षे स्थगित ठेवण्याचा प्रस्ताव दिला होता. परंतु शेतकऱ्यांनी हा प्रस्ताव स्वीकारला नाही. आता आम्ही शेतकऱ्यांकडून नव्या प्रस्तावाची वाट पाहात आहोत. मनात कोणताही संभ्रम न ठेवता त्यांच्याकडून मनमोकळी चर्चा अपेक्षित आहे. कायद्याचे अध्ययन व्हावेशेतकऱ्यांनी कायद्यातील कोणतेही आक्षेप ठोसपणे मांडले नाहीत. त्यांनी आधी कायद्याचे अध्ययन करावे त्यानंतर त्यांनाच हा कायदा शेतकऱ्यांच्या किती हिताचा आहे, ते पटेल. कायदा पारित झाला, तेव्हा शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी कायद्याचे स्वागत केले होते, याकडेही तोमर यांनी लक्ष वेधले.‘एमएसपी‘ कायदा कसा शक्य आहे?तोमर म्हणाले, एमएसपीचा कायदा कसा शक्य आहे? याचा भुर्दंड सामान्यांवर बसेल. परंतु एमएसपी आधीप्रमाणेच सुरू आहे. त्याला जराही छेडले जाणार नाही. शेतकऱ्यांमध्ये गैरसमज पसरविण्यात आला आहे. काँग्रेसकडून दिशाभूलकेवळ राजकीय स्वार्थासाठी काँग्रेस पक्षाने शेतकऱ्यांची दिशाभूल केली आहे. परंतु ही बाब फार काळ टिकणार नाही. शेतकऱ्यांनाही सत्य काय आहे ते उलगडेल, असेही ते म्हणाले. 

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलनNarendra Singh Tomarनरेंद्र सिंह तोमर