शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

Farmer Protest: शेतकऱ्याची आत्महत्या, दुसऱ्याचा थंडीने मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2020 03:37 IST

शेतकऱ्यांना करावा लागत आहे कडाक्याचा थंडीचा सामना; मागे न हटण्याचा बैठकीत निर्णय

- विकास झाडेनवी दिल्ली : दिल्लीतील कडाक्याच्या थंडीचा आंदोलक शेतकऱ्यांना सामना करावा लागत आहे. थंडीमुळे एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला तर एकाने ट्रक्टरखाली येऊन आत्महत्या केली. दररोज होणाऱ्या अशा घटनांमुळे शेतकऱ्यांमध्ये रोष असून आता जराही मागे हटायचे नाही असा निर्णय शेतकऱ्यांनी आज बैठकीत घेतला.आंदोलनाचा २२ वा दिवस आहे. हवेत प्रचंड गारठा आहे. थंडीपासून बचाव करण्यासाठी शेतकऱ्यांकडे सोयी नाहीत. टिकरी सीमेवर थंडीने गारठल्याने हरियाणाच्या जय सिंह या शेतकऱ्याचा मृत्यू झाला. तर दुसरीकडे बुधवारी बाबा राम सिंह यांच्या आत्महत्येचे दु:ख अनावर झाल्याने जसवीर सिंह या शेतकऱ्यांने स्वत:ला ट्रक्टरखाली झोकून आत्महत्या केली. बाबा राम सिंह यांनी बुधवारी सिंघू सीमेवर स्वत:ला गोळी झाडून आत्महत्या केली होतीे. शेतकरी इतक्या वेदनेत असतांना केंद्र सरकार कोणतेही पाऊल उचलत नसल्याचे त्यांनी मृत्यूपूर्वी लिहिलेल्या पत्रात नोंदविले होते. थंडीपासून बचाव व्हावा म्हणून सिंघू सीमेवर गॅस हीटर लावण्यात आले आहेत. परंतु ते अपूर्ण आहेत व गॅसचा खर्चही शेतकऱ्यांना परवडणारा नाही. ज्येष्ठ वकील मांडतील बाजूगरुवारी सिंघू सीमेवर संयुक्त किसान मोर्चाच्या बैठकीमध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये सुरू असणाºया शेतकरी आंदोलनासंदर्भात चर्चा झाली. संघटनेचे सदस्य संदीप पाटील यांनी माहिती देताना सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीदरम्यान आंदोलक संघटनांची बाजू ऐकून घेण्याकरिता सर्वोच्च न्यायालयाने आठ संघटना पक्षकार केल्याची माहिती मिळत आहे. मात्र यापैकी भारतीय किसान युनियन (भानु) ही संघटना संयुक्त किसान मोर्चाचा घटक नाही व उर्वरित सात संघटनांना न्यायालयाकडून कोणतीही सूचना अद्याप प्राप्त झाली नाही. संयुक्त किसान मोर्चाच्या समितीने सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी संदर्भात प्रशांत भूषण, भूषण दवे, कोलीन गोनसाल्वीस, एच.एस. फुलका यांच्यासोबत प्राथमिक चर्चा केली आहे. दुभाजकावर बीजारोपण!युपीगेट महामार्गावरील दुभाजकावर शेतकऱ्यांनी आता पालेभाज्या लावण्याचा उपक्रम सुरू केला आहे. आंदोलन अधिक दिवस चालले तर भाजीपाला कामात येईल असे शेतकऱ्यांनी सांगितले.‘दोन पावले मागे घ्यावीत’ भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय अध्यक्ष नरेश टिकेत यांनी शेतकरी आणि सरकारने दोन पावले मागे घेतली तर तोडगा निघू शकतो आणि आंदोलन मागे घेतल्या जाईल. सर्वोच्च न्यायालय तिसरा पक्ष बनून आल्याने लवकरच मार्ग निघेल अशी शक्यता त्यांनी वर्तवली.…म्हणून संत बाबा राम सिंह यांनी झाडून घेतली गोळीचंदिगड - शेतकऱ्यांचे आंदोलन अधिकच तीव्र झालेले आहे. या आंदोलनादरम्यान, संत बाबा राम सिंह यांनी स्वत:वर गोळी झाडून घेतली. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले होते. तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. बाबा राम सिंह यांचे शिष्य असलेले गुलाब सिंह यांनी आत्महत्येमागचं कारण स्पष्ट केलं. गुलाब सिंह यांनी सांगितले की, ९ डिसेंबर रोजी बाबाजींनी शेतकरी आंदोलनाला पाच लाख रुपयांची देणगी दिली होती. बुधवारी बाबा राम सिंह पुन्हा एकदा आंदोलनस्थळी पोहोचले होते. तिथे त्यांनी आपल्या सेवादारांना स्टेजवर जाण्यास सांगितले. बाबा राम सिंह गाडीत बसलेले होते. त्यानंतर त्यांनी एका पत्रात लिहिले की, अशा परिस्थितीत मी माझे शरीर या आंदोलनाला समर्पित करत आहे. कारमधील पिस्तुलाने त्यांनी गोळी झाडली. 

टॅग्स :Farmerशेतकरी