शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

Farmer Protest: कोणत्याही धमक्या, द्वेषभावना...; पोलिसांनी गुन्हा दाखल करताच ग्रेटा थनबर्ग आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2021 19:16 IST

Farmer Protest: ग्रेटाविरोधात दिल्लीत एफआयआर दाखल

नवी दिल्ली: दिल्लीच्या सीमेवर गेल्या ७० दिवसांपासून केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देणारी पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्गच्या अडचणीत वाढ झाली आहे. दिल्ली पोलिसांनी ग्रेटाच्या विरोधात एफआयआर दाखल केला आहे. या प्रकरणावर ग्रेटानं ट्विट करत भाष्य केलं. ग्रेटानं तिच्या ट्विटमधून आक्रमक भूमिका घेतली आहे.तेव्हा आपणही निषेध केला होताच ना?; 'त्या' विधानावरून उर्मिला मातोंडकरांचा थेट मोदींवर बाण?'मी शेतकऱ्यांसोबत उभी आहे. शेतकऱ्यांकडून सुरू असलेल्या शांततापूर्ण आंदोलनाला माझा पाठिंबा आहे. कोणत्याही प्रकारच्या द्वेषभावना, धमक्या, मानवाधिकारांचं उल्लंघन ही गोष्ट बदलू शकत नाही,' असं ग्रेटानं ट्विटमध्ये म्हटलं आहे. दिल्ली पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरनंतर ग्रेटानं हे ट्विट केलं आहे. ग्रेटाविरोधात पोलिसांनी कलम १५३ ए, १२० बीच्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. चिथावणीखोर ट्विट केल्या प्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ग्रेटा कशामुळे अडचणीत?पर्यावरण संवर्धनासाठी काम करणाऱ्या ग्रेटा थनबर्गनं शेतकरी आंदोलनाचं समर्थन करणारं ट्विट केलं. भारतात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनामागे आम्ही एकजुटीनं उभे आहोत, असं ग्रेटानं ट्विटमध्ये म्हटलं होतं. ग्रेटानं दुसऱ्या एका ट्विटमध्ये एक डॉक्युमेंट शेअर केलं होतं. त्यामध्ये भारत सरकारवर आंतरराष्ट्रीय दबाव निर्माण करण्यासाठीची रणनीती नमूद करण्यात आली होती. भारतावर पाच टप्प्यांमध्ये दबाव करण्याचा उल्लेख यामध्ये होता. ग्रेटानं हे ट्विट थोड्या वेळात डिलीट केलं.'Tweet Together'... सायना नेहवालनं अक्षय कुमारचं ट्विट जसंच्या तसं कॉपी केलंजुनं ट्विट डिलीट केल्यानंतर ग्रेटानं एक अपडेटेड टूलकिट शेअर केलं. या नव्या टूलकिटमध्ये अनेक बदल केले होते. २६ जानेवारीला भारतासह परदेशांमध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्याची योजना यामधून हटवण्यात आली होती. 'जर तुमची मदत करण्याची इच्छा असेल तर हे अपडेटेड टूलकिट आहे. मागील डॉक्युमेंट मी हटवलं आहे. कारण ते जुनं होतं,' असं ग्रेटानं नव्या टूलकिटसोबतच्या ट्विटमध्ये म्हटलं होतं.

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलन