शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी ठाम! केंद्र सरकारचा निर्णायक प्रस्ताव फेटाळला; उद्याची बैठक महत्त्वाची ठरणार

By कुणाल गवाणकर | Updated: January 21, 2021 21:16 IST

Farmers Protest: उद्या शेतकरी आणि सरकारमध्ये बैठकीची ११ वी फेरी; शेतकरी मागण्यांवर पूर्णपणे ठाम

नवी दिल्ली: केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचं सुरू असलेलं आंदोलन आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. दिल्लीच्या सीमेवर नव्या कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकरी आंदोलकांनी केंद्रानं दिलेला प्रस्ताव फेटाळून लावला आहे. कायदे दीड वर्षांसाठी स्थगित करण्याचा प्रस्ताव सरकारकडून देण्यात आला होता. मात्र हा प्रस्ताव शेतकऱ्यांनी फेटाळून लावला आहे. संयुक्त किसान मोर्चाच्या सभेत हा निर्णय घेण्यात आला. काल सरकार आणि शेतकऱ्यांचे नेते यांच्यामध्ये बैठकीची दहावी फेरी झाली. त्यावेळी सरकारनं दीड वर्षांसाठी कायद्यांना स्थगिती देण्याचा प्रस्ताव शेतकऱ्यांसमोर ठेवला. त्यामुळे शेतकरी आंदोलन करतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. यानंतर आज संयुक्त किसान मोर्चाची बैठक झाली. त्यात सरकारचा प्रस्ताव फेटाळून लावण्यात आला. कायदे पूर्णपणे मागे घेतले जावेत, अशी मागणी सभेत करण्यात आली.कालच्या बैठकीत काय झालं?सरकार कृषी कायद्यांना एक ते दीड वर्षांपर्यंत स्थगिती देण्यात तयार असल्याचं काल झालेल्या बैठकीनंतर कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी सांगितलं होतं. शेतकरी संघटना केंद्र सरकारनं दिलेल्या प्रस्तावावर गांभीर्याने विचार करतील. शेतकरी यावर चर्चा करून २२ तारखेला उत्तर देतील. २२ जानेवारीला होणाऱ्या चर्चेत याबाबत काहीतरी तोडगा निश्चित निघेल, अशी आशा नरेंद्र सिंह तोमर यांनी व्यक्त केली होती.उद्या होणार ११ वी बैठकउद्या शेतकरी आणि केंद्र सरकारमध्ये बैठकीची ११ वी फेरी होणार आहे. तीन कृषी कायदे पूर्णपणे मागे घ्या. सर्व शेतकऱ्यांच्या सर्व पिकांच्या हमीभावासाठी कायदे करा, या मागण्यांवर शेतकरी ठाम आहेत. त्यामुळे उद्या होणाऱ्या बैठकीकडे आता देशाचं लक्ष लागलं आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी