शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

Farmer Protest: तोडगा काढण्यास कोर्टाची समिती; आंदोलक शेतकरी संघटनांना नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2020 06:49 IST

नव्या कृषी कायद्यांविरोधात दिल्ली परिसरात सुरू असलेले आंदोलन कोणताही तोडगा दृष्टिपथात नसल्याने चिघळत चालले आहे.

नवी दिल्ली : नव्या कृषी कायद्यांच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी एक समिती नेमण्याचा विचार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. या समितीत शेतकरी संघटना व केंद्र सरकारच्या प्रतिनिधींचा समावेश असेल. सर्वोच्च न्यायालयाने शेतकरी संघटनांना नोटीस जारी केली असून, दिल्लीनजीकचे रस्ते रोखणाऱ्या शेतकऱ्याची नावे उद्या, गुरुवारपर्यंत देण्यास सांगितले आहे. नव्या कृषी कायद्यांविरोधात दिल्ली परिसरात सुरू असलेले आंदोलन कोणताही तोडगा दृष्टिपथात नसल्याने चिघळत चालले आहे. दिल्लीच्या सीमेनजीकचे रस्ते अडवून बसलेल्या आंदोलक शेतकऱ्यांना तिथून हटवावे, अशी मागणी करणाऱ्या याचिकेवर सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठापुढे बुधवारी सुनावणी झाली. चर्चेसाठी नेमण्यात येणाऱ्या समितीत ज्यांना घ्यायचे आहे, त्यांची नावे सुचवा. हा प्रश्न वेळीच सोडविला नाही, तर तो देशव्यापी स्वरूप धारण करेल, असे सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार व शेतकरी संघटनांना सांगितले. सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की, केंद्र व शेतकरी संघटनांमध्ये आतापर्यंत झालेली चर्चा निष्फळ ठरली आहे. असे होऊनही चर्चेसाठी तयार असल्याचा दावा दोन्ही बाजूंकडून केला जात आहे.इतरांनी आंदोलनाचा ताबा घेतल्याचा दावारस्ते अडवून आंदोलन करणाऱ्या शेतकरी संघटनांची नावे कळवा, असे सर्वोच्च न्यायालयाने सांगताच, सॉलिसिटर जनरल तुषार मेहता म्हणाले की, भारतीय किसान युनियन व अन्य काही शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी नव्या कृषी कायद्यांच्या मुद्द्यावर केंद्राशी चर्चा करीत आहेत. मात्र, आता शेतकरी आंदोलनाचा इतर काही लोकांनी ताबा घेतला आहे, असा दावा मेहता यांनी केला.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय