शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

शेतकऱ्याचा नादच खुळा! पठ्ठ्या अख्खे घरच सरकवून घेतोय!! दीड कोटीचे घर आले महामार्गाच्या वाटेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2022 08:27 IST

घरावर नितांत प्रेम करणाऱ्या या शेतकऱ्याचे नाव आहे सुखविंदरसिंग सुखी.

संगरूर :

माणूस घर बदलतो. सगळा संसार घेऊन एका घरातून दुसऱ्या घरात जातो; पण पंजाबातील एक शेतकरी चक्क आपले घरच एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन चालला आहे. मोठ्या प्रेमाने बांधलेले १.५ कोटी रुपये किमतीचे हे घर त्याला ५०० फूट अंतरावर सरकवून घ्यायचे असून, २५० फुटांपर्यंत ते सरकवण्यातही आले आहे. महामार्गाच्या वाटेत हे घर आल्यामुळे या शेतकऱ्याने अख्खे घरच सरकविण्याचा निर्णय घेतला.

घरावर नितांत प्रेम करणाऱ्या या शेतकऱ्याचे नाव आहे सुखविंदरसिंग सुखी. पंजाबच्या संगरूर जिल्ह्यातील रोशनवाला गाव शिवारात त्याने हे घर बांधले आहे. घर बांधायला त्याला २ वर्षे लागली, तसेच १.५ कोटी रुपये खर्च आला. मात्र, इतके प्रेमाने बांधलेले त्याचे हे घर दिल्ली- अमृतसर- काटरा एक्स्प्रेस-वेच्या मार्गात आले आहे. केंद्र सरकारचा हा महामार्ग भारतमाला प्रकल्पांतर्गत बांधला जात आहे. हरयाणा, पंजाब आणि जम्मू-काश्मीर या राज्यांना तो जोडणार आहे.

महामार्गासाठी भूसंपादन करण्यात आले तेव्हा पंजाब सरकारने सुखी यांना घराबद्दल नुकसानभरपाई देऊ केली होती. तथापि, भरपाई घेऊन पुन्हा नवे घर बांधण्याऐवजी सुखी यांनी आहे ते घरच रस्त्याच्या जागेवरून बाजूला सरकवून घेण्याचा निर्णय घेतला. महामार्गाला वाट मोकळी करून देण्यासाठी सुखी यांना आपले घर मूळ जागेवरून ५०० फूट अंतरावर सरकवून घ्यावे लागणार आहे.

...असे सरकते घर- सुखविंदरसिंग सुखी यांनी कामाला सुरुवात केली. गावातील बांधकाम मजुरांच्या मदतीने घराला जॅक्स लावून वर उचलण्यात आले. रेल्वेपटरीसारख्या मजबूत लोखंडी पटरीवरून घर हळूहळू सरकाविण्यात येत आहे. २५० फूट अंतर त्याने पार केले आहे. आणखी एवढेच अंतर पार करावे लागणार आहे.- जॅक्स, गीअर आणि चाकांच्या मदतीने अख्खे घरच हलविण्यात येत असल्यामुळे हा संपूर्ण पंजाबातील एक चर्चेचा विषय झाला आहे. लोक दूरदूरून घराचे स्थलांतर पाहायला येत आहेत. -  काही राष्ट्रीय वृत्तवाहिन्यांनीही त्याची दखल घेतली आहे. घर हलविण्यात येत असल्याचे व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाले आहेत.

टॅग्स :Punjabपंजाब