प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभच मिळेना, गुजरातमध्ये शेतकऱ्याची आत्महत्या

By महेश गलांडे | Published: January 5, 2021 03:34 PM2021-01-05T15:34:38+5:302021-01-05T15:35:33+5:30

आश्चर्य म्हणजे आत्महत्येपूर्वी काही तास अगोदर बलवंतसिंह यांनी आपल्या घरातून बाकोर पोलीस ठाण्यातील कार्यालयात फोन केला होता. त्यावेळी, सरकारी कर्मचारी आपलं काम करत नाहीत, त्यामुळे मी आत्महत्या करत असल्याचं त्यांनी पोलिसांना सांगितलं होतं.

Farmer commits suicide in Gujarat without getting benefit of Pradhan Mantri Awas Yojana | प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभच मिळेना, गुजरातमध्ये शेतकऱ्याची आत्महत्या

प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभच मिळेना, गुजरातमध्ये शेतकऱ्याची आत्महत्या

Next
ठळक मुद्देगुजरातमधील एक शेतकरी, शेतकरी योजनांचा लाभ मिळविण्यासाठी सरकारी कार्यालयात, पंचायत समितीत चकरा मारत होता. मात्र, सातत्याने पाठपुराव करुनही, खेटे मारुनही योजनेचा लाभ, रक्कम मिळाली नसल्याने पीडित शेतकऱ्याने पंचायत समिती कार्यालयातच स्वत:ला फासावर लटकवले

सुरत - देशात केंद्र सरकारच्या तीन कृषी विधेयकांना विरोध करत पंजाब आणि हरयाणातील शेतकरी दिल्लीच्या सीमारेषेवर उतरले आहेत. गेल्या महिनाभरापासून कडाक्याच्या थंडीतही त्यांचं आंदोलन सुरूच आहे. एकीकडे शेतकऱ्यांचा हा प्रश्न मार्गी लागत नाही, तर दुसरीकडे गुजरातमध्ये एका शेतकऱ्याने सरकारी कार्यालयातील अनास्थेमुळे आत्महत्या केली आहे. 

गुजरातमधील एक शेतकरी, शेतकरी योजनांचा लाभ मिळविण्यासाठी सरकारी कार्यालयात, पंचायत समितीत चकरा मारत होता. मात्र, सातत्याने पाठपुराव करुनही, खेटे मारुनही योजनेचा लाभ, रक्कम मिळाली नसल्याने पीडित शेतकऱ्याने पंचायत समिती कार्यालयातच स्वत:ला फासावर लटकवले. गुजरातच्या महिसागर जिल्ह्यातील ही ह्रदयद्रावक आणि सरकारी कार्यालयाची लख्तरे वेशीवर टांगणारी घटना आहे. येथील बांकोर गावचे शेतकरी बलवंत सिंह यांनी आपल्या ग्रामपंचायत कार्यालयातच फाशी घेऊन आपली जीव दिला. या शेतकऱ्याने एक सुसाईड नोटही लिहिली होती. त्यामध्ये, आजही माझ्या अंतर्मनात बीजेपीच आहे, पण या गरीब शेतकऱ्याचं काम कुणीच केलं नाही, असे बलवंतसिंह यांनी लिहिलं आहे. 

आश्चर्य म्हणजे आत्महत्येपूर्वी काही तास अगोदर बलवंतसिंह यांनी आपल्या घरातून बाकोर पोलीस ठाण्यातील कार्यालयात फोन केला होता. त्यावेळी, सरकारी कर्मचारी आपलं काम करत नाहीत, त्यामुळे मी आत्महत्या करत असल्याचं त्यांनी पोलिसांना सांगितलं होतं. मात्र, पोलिसांनीही त्याची गंभीर दखल घेतली नाही. त्यामुळे, बलवंतसिंह यांनी टोकाचे पाऊल उचलले. बलवंत सिंह यांचा मुलगा राजेंद्र भाईने माहिती देताना, वडिलांचं घराचं स्वप्न पूर्ण न झाल्याचं सांगितलं. प्रधानमंत्री आवास योजनेच्या यादीत नाव आलं होतं. पण, ग्रामपंयातीकडून त्यांना आर्थिक मदत मिळालीच नाही. त्यामुळे, वडिलांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं, असे राजेंद्र भाई यांनी सांगितलंय. 
 

Web Title: Farmer commits suicide in Gujarat without getting benefit of Pradhan Mantri Awas Yojana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.